डॉक्टरच जर या पायरीवर उतरत असतील तर ….
डॉक्टर कडून महिलेवर वारंवार बलात्कार
पुणे / नवप्रहार न्यूज नेटवर्क
पुण्यातून एक भयंकर घटना समोर येत आहे. येथे एका डॉक्टर कडून पेशंट असलेल्या महिलेसोबत ओळखी वाढवून तिला क्लिनिक मध्ये बोलविले. इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने तिला कपडे काढायला लावले आणि तिच्या छातीला हात लावून विनयभंग केला. त्यानंतर तिला वारंवार क्लिनिक मध्ये बोलवून बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी थेट कारवाई करत डॉक्टरला क्लिनिक मधून अटक केली आहे.
पुण्यातील मांगडेवाडी कात्रज परिसरातील एका क्लिनिकमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी डॉक्टराला अटक केली आहे.डॉ. अमित आनंदराव दबडे असं या नराधम डॉक्टराचं नाव आहे. मागील दीड वर्षांपासून म्हणजेच १ जुलै २०२२ पासून हा प्रकार घडत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. हा प्रकार वाढत गेल्याने पोलिसांकडे तिने धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टर अमित दबडे याचे कात्रज परिसरात मांगडेवाडी या ठिकाणी क्लिनिक आहे.
सदर क्लिनिकमध्ये तपासणी करण्याकरीता ३२ वर्षीय पीडित महिला आल्यानंतर त्याची तिच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर डॉक्टरने महिलेचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला मोबाईल फोनवर मेसेज आणि कॉल करून तिच्याशी गोड गोड बोलून त्याच्या हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतले. त्यानंतर तिचा हात धरून तिच्या छातीला हात लावून तिच्यासोबत गैरकृत्य केलं.
काही दिवस महिलेची इच्छा नसताना तिचा वारंवार पाठलाग करून तिला डॉक्टरने त्रास दिला. अखेर याबाबत महिलेने पोलिसांकडे धाव घेत, डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. या प्रकारानंतर पोलिसांनी (Police) डॉक्टरांवर थेट कारवाई केली आहे. दवाखान्यातून डॉक्टराला अटक केली आहे. डॉक्टरने केलेल्या कृत्यामुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे.नराधम डॉक्टर इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने या प्रकाराबाबत माफी मागण्याच्या बहाण्याने तिला क्लिनिकमध्ये बोलावलं. त्यानंतर पीडितेला त्याने कमरेत इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने कपडे उतरायला लावले. कुणी नसल्याची संधी साधत त्याने पीडितेवर बलात्कार केला.