हटके
मुम्बई / नावप्रहार मीडिया
जगात अनेक अजबगजब गोष्टी आहेत. ज्यांच्या बद्दल जाणून आश्चर्य वाटते. अमेरिका देशात कॅलिफोर्निया राज्यात मागील 122 वर्षांपासून एक बल्ब सतत जळत आहे. हे पाहून शास्त्रज्ञ देखील अचंभीत आहेत. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार त्याचा फिलामेन्ट एक वर्षच असतो.
लिव्हरमोर, कॅलिफोर्निया येथील अग्निशमन केंद्रात एक बल्ब बसवला आहे हे शेल्बी इलेक्ट्रॉनिक नावाच्या कंपनीने बनवले आहे, पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो गेल्या 122 वर्षांपासून जळत आहे. या बल्बचे नाव सेंटेनिअल आहे, जो पहिल्यांदा 1901 मध्ये लावला होता आणि तेव्हापासून आजतागायत हा बल्ब जळत आहे. 1901 मध्ये हा बल्ब 60 वॅटचा होता. 2023 मध्ये या बल्बचा प्रकाश 4 वॅट इतकाच राहिला आहे.
2001 मध्ये या बॉलला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिलेल्या मुलाखतीत फायर स्टेशनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, 1937 मध्ये पॉवर लाईन बदलण्यासाठी हा बल्ब पहिल्यांदा बंद करण्यात आला आणि वायर बदलल्यानंतर हा बल्ब जळू लागला.
2013 मध्ये एक काळ असा होता जेव्हा लोकांना वाटले की हा बल्ब फ्यूज झाला आहे. पण नंतर कळलं की हा बल्ब फ्युज झालेला नाही. उलट तेथे लावलेली 76 वर्षे जुनी वायर खराब झाली आहे. वायर दुरुस्त केल्यानंतर हा बल्ब लावला तर तो पुन्हा जळू लागला. हा बल्ब जगभरात कुतूहलाचा विषय आहे. दूरवरून लोकं हा बल्ब पाहाण्यासाठी येतात.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |