हटके
Related Articles
Check Also
Close
-
अन् त्याने प्रेयसी समोरच सोडला जीव ….!
4 weeks ago
गुजरात / नवप्रहार डेस्क
मृत्यू समोर दिसला की चांगल्या चांगल्याची ‘ … फाटून हातात येते ‘. या परिस्थितीत तो आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत असतो. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत तो पुरात सापडला असताना आणि पुलाच्या एकदम काठावर उभा आहे. याही परिस्थितीत तो तंबाखू मळतांना दिसत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक व्यक्ती पुराच्या पाण्यात पुलावर अडकली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला उभे असलेले या व्यक्तीला पाहत आहेत. दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी लोक काहीही करुन शकत नाहीत. मात्र पुराच्या पाण्यात अडकलेली ही व्यक्ती आरामात हात चोळताना दिसत आहे. ही व्यक्ती तंबाखू खात असावी असं दिसत आहे.
व्हिडीओ कोणत्या शहरातील आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओ आतापर्यंत 1.3 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. लाखो यूजर्सनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. पुरात अडकलेला बाईकस्वार वाचला की नाही? माहिती नाही. मात्र त्याची मृत्यू समोर दिसत असतानाही तंबाखू खाण्याच्या कृतीची जोरदार चर्चा होत आहे.
बाईकस्वाराच्या या कृतीबद्दल अनेकांनी आपली मते व्यक्त केली आहेत. अनेक युजर्सनी व्हायरल व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या व्यक्तीबद्दल सहानुभूती दाखवली. भीतीपोटी त्याने तंबाखू खाण्यास सुरुवात केली असावी असं एकाने म्हटलं. तर मृत्यूलाही न घाबरता तंबाखू खाताना पाहून अनेक यूजर्सनी त्याच्या धाडसाला सलाम केला आहे. मात्र तो नक्की तंबाखू खात होता की नाही, स्पष्ट झालेले नाही. मात्र व्हिडीओमध्ये दिसतंय त्यावरुन नेटिझन्सनी तसा अंदाज बांधला आहे.
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |