हटके

मैं 14 बरस की और वह 16 बरस का ; शाळेतील मुलांनी काढला पळ 

Spread the love

नागपूर / विशेष प्रतिनिधी

टिन एज लव्ह म्हणजे कुटुंब आणि जबाबदारी याचे काही भान नसते. डोक्यात असते ती एकच कल्पना ते म्हणजे लग्न. कोवळ्या वयात विपरीत लिंगाप्रत आकर्षण ही नैसर्गिक बाब आहे. पण याही वयात काही मुलं असा काही निर्णय घेतात की त्यावर विश्वास बसत नाही. आता तो चित्रपट आणि इंटरनेट च्या जगाचा फरक आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही. शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनी असे काही केले की त्यामुळे त्यांचेच नव्हे तर इतर विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे.

 लग्न करण्यासाठी विशिष्ट वय असतं. याचा विसर या कोवळ्या वयातील प्रेमी युगलाला पडला. मग काय कसला ही विचार न करता या दोघांनी ही शाळेला दांडी मारत थेट लग्न करण्याचा निर्णय घेतला.

त्याची पुर्ण तयारी ही दोघांनी केली. रेल्वेनं पळून जाण्याचा ठरलंय. लग्नाचं डेस्टीनेशन होतं दिल्ली. मग काय राजधानी एक्सप्रेसनं दिल्ली गाठण्याचंही ठरलं. त्यांनी ट्रेनही पकडली. ट्रेन दिल्लीच्या दिशेने निघाली. पण पुढे जो घटनाक्रम घडला त्याने या दोघांच्या ही स्वप्नावर पाणी फिरले.

तो नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचं वय जेमतेम 16 वर्षाचं आहे. तर ती त्याच्या शाळेत असून 8 वी इयत्तेत शिकते. तिचं वय ही अवघं चौदा वर्षाचं. दोघं ही एकमेकांकडे आकर्षीले गेले. आधी मैत्री झाली. पण लवकरच ते प्रेमाच्या बंधनात अडकले. बंगळूरूतील नामांकीत शाळेत हे दोघेही शिकत होते. मुलगा मुळचा दिल्लीचा. प्रेमात पडल्यानंतर आता लग्न केलं पाहीजे असं दोघांनी ठरवलं. वय लहान होतं. पण तरीही लग्न करण्याचा निर्णय त्या दोघांनीही घेतला. लग्न मुलाच्या शहरात म्हणजे दिल्लीत करायचं असं एकमतांनी ठरलं.

त्यासाठी शाळेतून पळून जाण्याचा त्यांनी प्लॅन केला. बंगळूरूवरून सुटणाऱ्या राजधानी एक्सप्रेसचं तिकीटही त्यांनी काढलं. ठरल्या प्रमाणे त्यांनी शाळेला दांडी मारत दिल्लीला जाणारी राजधानी एक्सप्रेसही पकडली. दोघेही शाळेत आले नाहीत त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात आली. पुढे त्यांचा काहीच पत्ता लागत नसल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली. शेवटी ते दोघे राजधानी एक्सप्रेसमध्ये असल्याचे समजले. पण ट्रेन बेंगळूरूवरून सुटली होती. ती नागपूरात जावू थांबली. त्यानंतर त्या दोघांनाही पोलिसंनी ताब्यात घेतलं. पुढे त्यांच्या पालकांनाही याबाबत माहिती देण्यात आली.

नागपूरात उतरवल्यानंतर त्यांचे समूपदेशन करण्यात आले. हे दोघे ही श्रींमत कुटुंबातील आहेत. त्यांच्या पालकांना मोठा व्यवसाय असल्याचेही आता समोर आले आहे. त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. दोघेही सुरक्षित सापडल्याने शाळा प्रशासनानेही सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र ऐवढ्या कोवळ्या वयात लग्नासाठी पुळून जाणाऱ्या या जोडप्याची चर्चा मात्र सगळीकडेच होत आहे.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close