हटके

अजबच हं ……. मॉर्निंग वॉक ला एकटी गेली म्हणून दिला घटस्फोट

Spread the love

प्रतिनिधी / ठाणे

                  जगात कधी काय घडेल याचा काहीच नेम नसतो. काही लोकं असे काम करतात की त्यांना काय म्हणावं ? असा प्रश्न पडतो. आता हेच पाहा न ! बायको एकटी मॉर्निंग वॉक ला गेली म्हणून नवऱ्याने तिला घटस्फोट दिला आहे. घटना ठाणे जिल्ह्यातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांनी पत्नीला ‘ट्रिपल तलाक’  दिल्याच्या आरोपाखाली एका 31 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी या घटनेची माहिती दिली.

मुंब्रा भागातील रहिवासी असलेल्या आरोपीने मंगळवारी आपल्या 25 वर्षीय पत्नीच्या वडिलांना फोन केला आणि सांगितले की तो ‘तिहेरी तलाक’द्वारे त्यांचे लग्न रद्द करत आहे कारण त्याची पत्नी एकटी फिरायला जात होती, असे अधिकाऱ्याने सांगितले.

पत्नीच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी बुधवारी भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(4) अंतर्गत गुन्हेगारी धमकी आणि मुस्लिम महिला (विवाह अधिकारांचे संरक्षण) कायद्यानुसार एफआयआर नोंदवला, असे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

आधी त्यांनी घटस्फोट घेतला आणि नंतर हलाला केला आणि एकत्र राहत होते.

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे एका जोडप्यामध्ये विभक्त झाल्याची अनोखी घटना समोर आली आहे. पतीने एकदा तलाक (Tripple Talaq) उच्चारला आणि तीन महिने तिच्याशी बोलले नाही. मात्र, या काळात पती-पत्नी एकाच घरात राहत होते. नंतर दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करार झाल्यानंतर विवाहित महिलेसाठी हलाला करण्यात आला.

पुनर्विवाह केल्यानंतर ते पती-पत्नी म्हणून राहू लागले, मात्र दोन वर्षांनी पतीने पुन्हा तिहेरी तलाक देऊन घराबाहेर काढले. आता पीडितेने एसपी ऑफिसला तक्रार पत्र देऊन आरोपी पती आणि सासरच्यांविरोधात एफआयआर नोंदवण्याची विनंती केली आहे.

हे प्रकरण गजरौला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. शेतकऱ्याने आपल्या मुलीचे लग्न गुलावती पोलीस स्टेशन आणि बुलंदशहर जिल्ह्यातील शहरातील एका तरुणाशी केले होते. लग्नात आई-वडिलांनी भरपूर हुंडा दिला होता.

विवाहितेचा सासरच्या घरात हुंड्यासाठी छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. तिने तीन मुलांनाही जन्म दिला. यादरम्यान पतीचे दुसऱ्या पंथातील मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू झाले. याला विवाहितेने विरोध केल्याने घरात तणाव वाढला.

SC ने तिहेरी तलाक असंवैधानिक घोषित केला होता

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने 22 ऑगस्ट 2017 रोजी दिलेल्या निकालात तिहेरी तलाक असंवैधानिक घोषित केला होता. SC ने 1400 वर्ष जुनी प्रथा असंवैधानिक घोषित केली होती आणि सरकारला कायदा करण्यास सांगितले होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कायदा करताना तीनदा तलाक लिहून किंवा बोलून लग्न मोडणे गुन्ह्याच्या श्रेणीत समाविष्ट केले. या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कारावासाचीही तरतूद आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close