विदेश

ते पाहत होते अन्नाची वाट पण मिळाला मृत्यू

Spread the love

रफाह  / नवप्रहार वृत्तसेवा

                          इस्त्रायल – हमास युद्ध सुरू आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात गाझा पट्टीत भयंकर नुकसान झाले आहे. येथे अन्न व पाण्या वाचून महिला, वृद्ध आणि मुलांचे हाल।होत आहे. पॅलेस्टिनी नागरिकांना जेवण मिळावे यासाठी अमेरिके कडून त्यांना अन्नाची पॅकेट देण्यात येत आहे. हे पॅकेट विमानाद्वारे टाकण्यात येत आहे.पण अन्नाच्या पॅकेट बॉक्स चे पॅराशूट वेळेवर न उघडल्याने ते एका घरावर पडून घरातील पाच लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 अमेरिकेच्या मदतीच्या विमानांनी घिरट्या घालायला सुरुवात केल्यावर ही अन्नाची पाकिटे मिळवण्यासाठी खाली मोठी गर्दी जमा झाली होती . विमानातून अन्नाच्या पाकिटांची खोकी टाकण्यात आली. मात्र या खोक्यांना जोडलेली पॅरेशूट वेळेवर न उघडल्यामुळे ही खोकी थेट खाली जमा झालेल्या गर्दीवर पडली. यामध्ये लहान मुले, किशोरवयीन युवक आणि महिला देखील होत्या.

अंगावर ही अवजड खोकी एका घराच्या छतावर एखाद्या रॉकेटप्रमाणे पडली. त्यामुळे या घराचे छतच कोसळले. त्यामुळे घरात असलेल्या या ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाला, असे प्रत्यक्ष साक्षीदाराने सांगितले.

इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून उत्तर गाझातील लोक वीज, पाणी, सांडपाणी इत्यादी मूलभूत सुविधांअभावी जगत आहेत. गाझाची स्थिती दुष्काळाच्या परिस्थितीपेक्षा कमी नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close