हिवरखेड पोलीस स्ठेशन आवारात चालला गाडगेबाबाचा खराटा राबवीले स्वच्छता अभियान..
निराश्रीत गरजूंना केले साडी चोळी वाटप
बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड पोलीस स्टेशन मधे स्वच्छतेचे जनक संत गाडगेबाबा यांची जयंती ला पोलीस स्टेशन परिसरात ठानेदार गजानन राठोड दूय्यम ठानेदार श्रीराम जाधव, दूय्यम ठानेदार,गोपाल बिलबिले,ऐ एस आय,महादेव नेवारे यांचे अधिपत्याखाली देव दगडात नसून अंध अपंग निराश्रितामधे देव पहानारे व लोकाच्या डोक्यातील अंधश्रद्लेला चपराक लावनारे संत गाडगेबाबा यांची जयंतीला सर्व परीसरातील गवत घान कचरा स्वता फावडे ईळा हातात घेऊन सफाई अभीयानात भाग घेत सर्व पोलीस कर्मचारी यांनी खराटा घेऊन पुर्ण परीसर साफ केला तसेच निराश्रीत गरजु महीलाना संतगाडगे बाबा सेवा समीतीच्या ऊपक्रमात सहभाग घेत साडी चोळी वीतरण केले तसेच पोलीस स्टेशन परीसरात वाढलेले तन झाडाची व्यवस्थीत कटाई करुन आवारात खराट्याने पुर्ण परीसर झाडून स्वच्छता अभियान राबवीले या वेळी प्रफुल पवार, गणेश साबळे, पाटील चव्हान सह गृहरक्षक दलाचे गोपाल परनाटे संजय खिरोडकर, भराटे,नितीन शर्मा यांनी सूद्धा गाडगेबाबाचे दशसूञीचा जागर करत स्वच्छता अभीयानात भाग घेतला व सर्वानी गाडगेबाबाला नतमस्तक होऊन मानाचा मूजरा दिला