Uncategorized

पतीचे अनैतिक सबंध; पत्नीचे अश्लील व्हिडिओ बनावट केली 10 लाखांची मागणी

Spread the love

 गोरखपूर / विशेष प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून नवरा आणि बायकोच्या नात्याला काळीमा फास प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीचे अश्लील व्हिडिओ काढत तिला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीचे अन्य महिलेसोबत अनैतिक सबंध असल्याने आणि तिने त्याला विरोध केल्याने त्याने असे केल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. त्यानंतर तिला 10 लाख रुपये पैशांची मागणी देखील केली होती.

हे प्रकरण पंचायतीपर्यंत गेले आणि त्यात तोडगा निघाला. त्यानंतर तिचा पती तिला त्रास देऊ लागला होता. पतीचे परस्त्रीसोबत प्रेमसंबंध असून तो त्या महिलेशी विवाह करू इच्छित होता, अशी माहिती समोर आली. दरम्यान, ही घटना गोरखपूर पोलीस ठाणे परिसरातील आहे.

‘साहेब! मला मदत करा, माझ्या पतीने…’

संबंधित प्रकरणात महिला रडत रडत पोलीस ठाण्यात गेली. तिने पोलिसांना विनंती केली की, साहेब! मला मदत करा, माझ्या पतीने माझे काही अश्लील व्हिडिओ बनवले आहेत. जेव्हा मी त्याला व्हिडिओ डिलिट करण्यास सांगितले, तेव्हा त्याने 10 लाखांची मागणी केली होती.

त्यानंतर पीडितेनं सांगितलं की, माझा लग्नापासूनच सासरच्या लोकांनी छळ केला आहे. पती सीतापूर येथील एका कारखान्यात नोकरी करतो. महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, तिने विरोध दर्शवला तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली आहे. एके दिवशी त्याने अंमली पदार्थ पाजून बेशुद्ध केलं. त्यानंतर, त्याने माझा अश्लील व्हिडिओ बनवला.

पीडितेकडे 10 लाखांची मागणी

त्यानंतर, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पीडितेला व्हिडिओ डिलिट करण्यावरून 10 लाखांची मागणी केली होती. व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची देखील धमकी देतो, असं पीडितेनं सांगितलं.

महिलेनं तिच्या तक्रारीत नमूद केलं की, लग्नापासून तिचा पती आणि सासरले लोक हुंड्यासाठी तिचा छळ करत होते. त्यांनी तिला अनेकदा मारहाणही केली होती. 2016 मध्ये पंचायतीत तोडगा काढण्यात आला होता, परंतु अलीकडे अत्याचारात पुन्हा वाढ होऊ लागली होती. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close