अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे सायफळ येथील जलजीवन मिशनचे काम रेंगाळले.

घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी पंचायत समीती अंतर्गत येणाऱ्या सायफळ येथे जलजीवन मिशन अंतर्गत ६२ लक्ष रूपये निधी मंजूर करून जलजीवन मिशनचे काम सुरू करण्यात आले मात्र गेल्या काही महिन्यापासून कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे सदर चे काम बंद अवस्थेत असल्याचे दिसत आहे. कंत्राटदाराने नदीकाठी विहीर खोदून विहीरीचे बांधकाम केले त्या विहीरीपासून काही अंतरापर्यंत पाईपलाईनचे काम करण्यात आले मात्र गावात टाकीचे बांधकाम करणे गरजेचे असतांना टाकीच्या कामाला सुरूवात करण्यात आल्याचे दिसतच नाही कंत्राटदार जलजीवन मिशनचे काम अर्धवट सोडून गायब झाल्याने सायफळ येथील जलजीवन मिशनचे काम पुर्ण होणार का नाही?. अशी चर्चा गावक-यांमध्ये रंगत आहे. काम बंद असल्याचे कारण विचारण्या करीता सदर कंत्राटदाराला वारंवार भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद कंत्राटदार देत नसल्याने सदर कामाबाबत गावक-यांमध्ये शंका निर्माण होत आहे. सायफळ हे गाव घाटंजी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असतात यामुळे येथे काम करणारे आपल्या च मनमर्जीने काम करीत असतात. सायफळ हे गाव पैनगंगेच्या काठावर असूनही वारंवार गावात पाण्याची समस्या निर्माण होत असते पाणी पुरवठा साठी या आधी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची उपयोजना केली नसल्याने सरळ पैनगंगा नदीपात्रातून मोटारपंपाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येते मात्र विद्यूत पुरवठा कमी असल्याने गावात एका दिवशी संपूर्ण वार्डात पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याने दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येते यामुळे ग्रामस्थांना पाण्याची कमतरता भासते याचा विचार करता प्रशासनाकडून जलजीवन मिशन अंतर्गत निधी मंजूर करून कामाला सुरूवात करण्यात आली. मात्र जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षीत हे काम पुर्णत्वास कधी जाईल अशी शंका गावकरी व्यक्त करीत आहे. याकडे जिल्हाअधिका-यांनी तात्काळ लक्ष देऊन बंद अवस्थेत असलेले काम सुरू करण्याची मागणी केली जात आहे.
00000000000