हटके

पती -पत्नी और वह, रस्त्यातच राडा 

Spread the love

भुवनेश्वर (ओडिशा) / नवप्रहार डेस्क 

                     नवरा – बायकोच्या  विवाहबाह्या संबंधामुळे अनेक वेळा पती -पत्नी आणि प्रेयसीत राडा झाल्याचे पाहायला मिळते. कधी कधी तर पत्नी आणि प्रेयसी मध्ये भरसरत्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी राडा झाला की त्याच्या कडे गपगुमान उभा राहून तमाशा पाहण्यापेक्षा दुसरा पर्याय नसतो. अशीच घटना छतरपूर  मध्ये पाहायला मिळाली  आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, पत्नी आपल्या कुटुंबासह कारमधून प्रवास करत होती. त्यावेळी तिचा नवरा दुसऱ्या महिलेसोबत स्कूटरवरून जात असल्याचे तिला दिसले. त्यानंतर पत्नीने त्याला स्कूटर थांबवण्यासाठी ढकलून खाली पाडले. यानंतर महिला गाडीतून खाली उतरताच तिच्यासोबत असलेल्यांनी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. व्हिडिओ बनवताना ती महिला आपल्या मुलाला दाखवते आणि म्हणते, ‘बेटा, हे बघ तुझे वडील आहेत आणि ते आता आपल्या नवीन आईसोबत राहत आहेत. यानंतर पत्नीने थेट दुसऱ्या महिलेला पकडून ती कोण आहे आणि पतीसोबत काय करते, अशी विचारणा सुरू केली. यादरम्यान पत्नी दुसऱ्या महिलेला ढकलताना दिसत आहे. दुसऱ्या महिलेच्या तोंडावर बांधलेले कापड उघडते आणि तिला सतत विचारते, तू कोण आहेस आणि तू त्याच्याबरोबर काय करते आहेस, मला तुझे नाव सांग? दरम्यान, पत्नीसह तिच्या कुटुंबीयांनीही महिलेला शिवीगाळ केली.

भररस्त्यात गोंधळ सुरू असतना नवरा म्हणतो बनवा व्हिडिओ, काही हरकत नाही. महिलेचे नाव नीलम आहे आणि ती माझ्यासोबत राहते. सध्या आम्ही हॉस्पिटलमध्ये जात आहोत. तू मला सोडून गेल्यामुळे आता तुला माझी काळजी नको. यानंतर पती स्कूटर उचलतो आणि दुसऱ्या महिलेला बसवून तेथून निघून जातो. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती हा व्यवसायाने शिक्षक असून, दोघांमध्ये 4 वर्षांपासून घटस्फोटाचा खटला सुरू आहे.

 

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close