क्राइम

देवदर्शनाला गेलेल्या पती पत्नी मध्ये झाला वाद ; पतीने केले पत्नीला जीवनातून बाद 

Spread the love

बारामती / विशेष प्रतिनिधी 

                     एकदा का मनात शंकेने घर केले की मग त्यातून बाहेर पडणे अशक्य होऊन बसते. ही शंका मनुष्याला आतल्या आत पोखरत असते. आणि मग याचे पर्यवसान कुठल्यातरी घटनेत होते. असच प्रकार शैला आणि अक्षय या पती पत्नी सोबत घडला आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याची शंका पतीला आली. आणि त्याने ज्या SUV कार ने ते देवदर्शनाला गेले होते. त्याच कार खाली तिची चिरडून हत्या केली.

 पतीने आपल्या पत्नीला एसयूव्हीखाली चिरडून तिची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. समोर आलेल्या वृत्तांनुसार आरोपी पतीने आधी आपल्या पत्नीला एसयूव्हीमधून बाहेर ढकललं आणि त्यानंतर रस्त्याच्या कडेला तिला मारहाण केली आणि मग तिची हत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय आणि त्याची 28 वर्षीय पत्नी शैला गुरुवारी सकाळी गणगपुरा येथे प्रवास करत होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास, बल्लूरगा गावाजवळ या जोडप्यात वाद झाला आणि अक्षयने शैलाला गाडीतून बाहेर ढकलले.

ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, ही क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शैला मदतीसाठी याचना करत असताना अक्षय तिला निर्घृणपणे मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. शैलाला मारहाण केल्यानंतर अक्षयने तिच्या अंगावरून एसयूव्ही चालवली.

अक्षय आणि शैला यांचं लग्न होऊन चार वर्ष झाली होती आणि हे दोघंही मूळचे बारामतीचे होते, अशी माहिती कलबुर्गीचे पोलीस अधीक्षक अड्डुरु श्रीनिवासुलू यांनी दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार शैलाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अक्षयला होता आणि या संशयावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला होता. पोलिसांनी आरोपी पती अक्षय याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू केला आहे.पतीने चिरला पत्नीचा गळा

दुसरीकडे कर्नाटकाच्याच कलबुर्गीमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने रस्त्याच्या मधोमध पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली. ही घटना कलबुर्गी जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील बल्लुर्गी गावाजवळ घडली, अशी माहिती पोलिसांनी पीटीआयला दिली. आरोपी पतीने पत्नीला जबरदस्ती गाडीतून आणलं आणि तिला रस्त्यावर उतरण्यास भाग पाडलं, यानंतर त्याने पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close