पत्नीचा खुना केल्या प्रकरणी पतीस जन्मठेपे.

पुसद / प्रतिनिधी
घरगुती पत्नीचा खून केल्याप्रकरणी गुना सिद्ध झाल्यामुळे भादवि कलम ३०२ नुसार जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा व दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साधी शिक्षा असा महत्त्वपूर्ण निकाल आज २ मे रोजी पुसद जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला.
पुसद येथील न्यायाधीश क्रमांक एक बीबी कुलकर्णी यांनी मौजे बान्सी तालुका पुसद येथील आरोपी सुनील वाघोजी बोखारे यांना पत्नीच्या खुणाच्या आरोपात भा द वी कलम ३०२ नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून त्यामध्ये सरकारी वकील एड.महेश निर्मल यांनी काम पाहिले.
आरोपी सुनील बोखारे हा मयत पत्नी मनीषा सोबत एकत्र कुटुंबात राहत होता ६.८.२०१७ रोजी सर्व कुटुंब जेवण केल्यानंतर रात्री आरोपीं व मनीषा यांच्या रूममध्ये झोपण्यास गेले सकाळी चार वाजता या दरम्यान आरोपीची आई जागी झाली असता तिला आरोपीच्या रूमचे दार उघडे दिसले. खोलीमध्ये जाऊन पाहिले असता मनीषा हिचा मृतदेह पलंगाच्या बाजूस खाली पडलेल्या अवस्थेत दिसला तसेच आरोपी बाजूला उभा होता मनीषा तिच्या गळ्यावर व चेहऱ्यावर ओरखडे होते आरोपीचे आई ने विचारणा केली असता मनीषा पडली व बेशुद्ध झाली आहे आईने शेजाऱ्यांना बोलून मनीषा आईला पुसद येथे दवाखान्यात नेले मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मनीषा मृत झाल्याची बातमी कळतात आरोपी तेथून पसार झाला. मृत मनीषा च्या कुटुंबीयाना ही माहिती मिळतात त्यांनी पुसद दवाखाना गाठला आरोपी यावेळेस गैरहजर असल्याने त्याच्या गैरहजेरीमध्ये शवविच्छेदना नंतर अंतिम संस्कार करण्यात आला शवविच्छेदनामध्ये मनीषा हिचा गळा दाबून खून केल्याचे डॉक्टर रिपोर्ट आला. त्यानुसार फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे आरोपी विरुद्ध माधवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल सिद्ध करण्याकरिता सरकारी पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली त्यामध्ये मयत मनीषा हिचा भाऊ प्रशांत दरोडे आजोबा रामाजी गोडबे व इतर महत्त्वाची साक्ष घेण्यात आली घटना घडल्यानंतर आरोपी पाच दिवसांनी अटक करण्यात आला आरोपी अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणी केल्यास त्याच्या हातावर चावा घेतल्याचे निशाण वैद्यकीय अहवालामध्ये आलेला आहे. सरकारी पक्षातर्फे सादर केलेले पुरावे व सरकारी वकील एड.महेश निर्मल यांनी केलेल्या युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सुनील वाघोजी बोखारे यांच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने पुसद येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक एक व्ही बि कुलकर्णी यांनी आरोपी जन्मठेप ची शिक्षा व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा सुनावली आहे.