क्राइम

पत्नीची ओढणीने गळा दाबून हत्या ; पतीला अटक

Spread the love

कुरुंदवाड / नावप्रहार डेस्क

              नुकतेच लग्न झालेल्या एका नवविहाहितेची तिच्या पतीकडून ओढणीने गळा दाबून हत्या करण्यात आली. प्रतीक्षा जयदीप यादव (वय.२१, रा. ओमसाई सोसायटी, देहू-आळंदी रोड, देहूगाव) असे या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पती जयदीप अर्जुन यादव (वय ३०) याला देहूरोड पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात उभे केले असता २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

कुरूंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा हिचे एम.एस.सी.पर्यंत दिले होते. दोन महिन्यापूर्वी सांगलीतील चिखलगोळ येथील डिप्लोमा इंजिनियर पर्यंत शिक्षण झालेल्या जयदीप यादवशी तिचे लग्न झाले होते.जयदिप हा पुणे येथे नोकरीला होता. ८ दिवसापूर्वी पत्नी प्रतीक्षाला पुण्यात घेऊन गेला. त्यानंतर गुरुवारी रात्री जयदीप हा प्रतीक्षाला ते राहत असलेल्या देहगाव येथील गाथा मंदिरामागील इंद्रायणी नदीच्या घाटावर फिरायला म्हणून घेवून गेला. तेथे ओढणीने प्रतिक्षाचा गळा आवळून त्याने खून केल्याची घटना घडली.संशयित आरोपी पती जयदीप यादव याला पोलिसांनी अटक केली.

प्रतिक्षा यादवचा खून झाल्याची माहिती कुरुंदवाड येथील माहेरच्या नातेवाईकांना पोलिसांनी दिली. नातेवाईकांनी पुण्यात जाऊन जयदीप यादवच्या विरोधात देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करून आई-वडिलांच्या ताब्यात दिला. सायंकाळी कुरुंदवाड येथील कृष्णा घाट येथे मृतदेहावर अत्यसंस्कार करण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close