बस आगारप्रमुख साकोली यांना विध्यार्थ्यांच्या समस्यांचे निवेदन
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) साकोली तहसील मधील एकोडी गाव हे परिसरातील मुख्य गाव असून शैक्षणिक शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. एकोडी इथे जिल्हा परिषद हायस्कूल, कामाई करंजेकर विद्यालय, तथा बोरगाव फाटा या ठिकाणी निर्धन पाटील वाघाये विद्यालय आहे.
या ठिकाणी तुमसर मार्गे येणाऱ्या बस मध्ये सोनेगाव, ऊसगाव, मक्कीटोला, चांदोरी , सुंदरटोली पळसपाणी येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बस ने येणे जाणे करतात. विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ ही सकाळी 10.30 ला असते व रोज विद्यार्थी येणे जाणे करतात.
परंतु मागील 20 दिवसापासून साकोली तुमसर सकाळी 7 वाजताची बस बंद झाल्याने विध्यार्थी हे सकाळी 10.30 ला विद्यालयात पोहचू शकत नाही त्यामुळे त्यांच्या सुरवातीच्या दोन तासिका त्यांना उपस्थित राहता येत नाही.
तसेच शनिवार ला सकाळी शाळा असल्याने सुट्टी ही 11 वाजता होते परंतु सकाळी 10.30 नंतर सरळ 1 ते 2 च्या मधात बस आल्याने विद्यार्थी दोन वाजे पर्यत बस थांब्यावर बसून राहतात.
ही विद्यार्थ्यांची तसेच विद्यालयाच्या शिक्षकांची अडचण ऐकून ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले यांनी थेट साकोली आगार व्यवस्थापक सचिन आगरकर यांना भेटून सविस्तर माहिती दिली व सकाळी 7 वाजता साकोली तुमसर गाडी सोडण्यात यावी या संबंधाने निवेदन दिले.
निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य तथा जिल्हा अध्यक्ष प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भावेश कोटांगले, डी. जी . रंगारी पत्रकार, गोपीनाथ मेश्राम, जयंत बोरकर उपस्थित होते.