शक्तिवर्धक गोळ्या घेऊन पती झाला हैवान , मधुचंद्राच्या दुसऱ्याच दिवशी नववधू पोहचली दवाखाण्यात

लग्नाच्या पहिल्याच रात्री पतीनं शक्तीवर्धक गोळ्या घेऊन शारीरिक संबंध ठेवले, त्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला, असा आरोप नवविवाहित वधूच्या कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबियांच्या आरोपानंतर हमीरपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याशिवाय या प्रकरणाची पारावर अन् टपरीवर दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
हमीरपूर जिल्ह्यातील पीडब्ल्यूडी कॉलोनीमध्ये ही घटना घडली. 3 फेब्रुवारी 2024 रोजी नितिल ओमरेसोब सगुण हिचं लग्न झालं होतं. लग्नात हुंडा देऊन कुटुंबानं आनंदानं आपल्या मुलीचा निरोप घेतला. लग्नाच्या पहिल्याच रात्री महिलेच्या पतीनं शक्तीवर्धक गोळ्या खाऊन शरिरसंबंध ठेवले. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे सासरच्यांनी मुलीच्या कुटुंबीयांना आजाराची खोटी माहिती दिली आणि उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. मुलीवर कानपूरमध्ये उपचार करण्यात आले. पण उपचारादरम्यान मृत्यू झाला. कमी वयात मृत्यू कसा झाला? हे जाणून घेण्यासाठी कुटुंबीयांनी कानपूरमध्ये पोस्टमार्टम केलं. त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. इतकंच नाही तर मृत मुलीनं मृत्यूपूर्वी आपल्या वहिनीला सत्य सांगितलं होतं. आता याप्रकरणी कारवाईची मागणी कुटुंबीय करत आहेत.
मुलीची परिस्थिती पाहून डॉक्टर अवाक्
मृत महिलेच्या वहिनीनं दिलेल्या माहितीनुसार, त्यांचं कुटुंब कानपूरमध्ये एका लग्नासाठी गेलं होतं. पण, आपल्या नणंदेची बातमी कळताच आम्ही कानपूरमधून तडक निघून उरईला पोहचलो. नणंदेची प्रकृती लक्षात घेऊन तिला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तिथे तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे कानपूर रुग्णालयात तिला हलवण्यात आलं. ज्यावेळी आम्ही तिला विचारलं, तेव्हा तिने आपल्यासोबत पतीनं लग्नाच्या पहिल्या रात्री शक्तीवर्धक गोळ्या खाऊन शारीरिक संबंध ठेवल्याचं सांगितलं. त्यानंतर मुलीला स्त्रीरोग तज्ज्ञाला दाखवण्यात आलं. परिस्थिती पाहून डॉक्टरही हैराण झाले. त्यांनी सांगितलं की, मुलीच्या तपासणीनंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचं दिसत आहे.