तलाठी भरती प्रक्रिया रद्द करा शेकडो विद्यार्थ्यांची नांदगाव तहसील कार्यालयात धडक
तलाठी भरती परीक्षा घोटाळा प्रकरणाचा मास्टर माईंड शोधा:- प्रकाश मारोटकर
नांदगाव खंडेश्वर/ प्रतिनिधी
तलाठी भरती प्रक्रिया पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडली असून तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून शेकडो विद्यार्थ्यांनि तहसील कार्यालयात धडक देऊन संपूर्ण तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने एम पी एस सी मार्फत तीन महिन्यांत पारदर्शक भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनि केली
तलाठी भरती प्रक्रिया हि पहिल्या दिवसा पासूनच संशयाच्या भवऱ्यात होती या तलाठी भरती पेपर फुटी प्रकरणांत गुन्हे सुद्धा दाखल आहेत आणि आता तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर गुणांमध्ये विसंगती आहे सरकार हि परीक्षा आणि सगळी प्रक्रिया पारदर्शक झाली असल्याचा दावा करीत आहे आणि गुणांकनात विसंगती असल्याचे उघड असतांना सरकार मात्र विद्यार्थ्यांनाचं पुरावे मागत आहे सदर भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करून या भरती प्रक्रिया रद्द करून या भरती प्रक्रियेतील मास्टर माईंड शोधून त्याचेवर कठोर कारवाई करावी व तात्काळ एम पी एस सी मार्फत नव्याने तलाठी भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी विद्यार्थ्यांनि सरकार विरोधात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढून केली आहे यावेळी शिंदे फडणवीस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भरती प्रक्रियेत घोळ करून सरकार विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ खेळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनि करून पारदर्शक शब्दाला लाजवतील असा कारभार सध्या सरकारचा सुरू आहे यावेळी शेकडो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते सर्वच विभागाच्या भरती प्रक्रिया एम पी एस सी मार्फत राबवावी व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पोलीस भरती लवकरात लवकर घेण्यात यावी अश्या विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना सादर करण्यात आले यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर अक्षय राणे चेतन धवने मनोज ढोके अक्षय हिवराळे शुभम रावेकर पवन शिरभाते महात्मा जोतिबा फुले अभ्यासिकेचे शुभम मोकडेकर स्वप्नील सुरोशे ऋषिकेश मारोटकर स्वराज्य अभ्यासिकेचे राहुल हजारे प्रतीक कोल्हे ज्ञानगंगा अभ्यासिकेचे रामेश्वर हजारे पवन गोंडाने डॉ पंजाबराव देशमुख अभ्यासिकेचे सागर वेरुळकर गौरव शेबे उषा तरोने मृणालि चिंचुलकर प्रतीक्षा इंगोले इत्यादी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी उपस्थित होते
———————————
*गुन्हे दाखल असतांना शासनाला अजून कोणते पुरावे हवे*
*प्रथम गुणांकणाच्या यादीत कमी गुण मिळवलेल्या उमेदवाराला सुधारित दुसऱ्या गुणांकणाच्या यादीत दोनशेहून अधिक गुणांनी उत्तीर्ण होतात हे कसे काय शक्य आहे तसेच काही उमेदारावर पेपर फुटी प्रकरणी गुन्हे दाखल असतांना सुद्धा सरकार विद्यार्थ्यांना पुरावे मागत आहे हि फार लाजिरवाणी बाब असून तात्काळ तलाठी भरती प्रक्रिया रद्द न केल्यास शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरले असा इशारा प्रकाश मारोटकर यांनी दिला*
———————————
सर्व विभागाच्या परीक्षा ह्या एम पी एस सी मार्फत शासनाने घ्याव्या टी सी एस कंपनी पारदर्शक भरती प्रक्रिया राबवित नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे तसेच परीक्षा फि अल्प प्रमाणात ठेवण्यात यावी असे मत स्वप्नील सुरोशे या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले