हटके

दिल्ली मेट्रोत हे चाललंय तरी काय ?…..

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                मागील काही दिवसांपासून दिल्ली मेट्रो त्यात घडणाऱ्या घटनेमुळे चर्चेत आहे. कधी बिकनी घालून तर कधी स्कर्ट घालून मेट्रोत अश्लील नृत्य करणारी तरुणी तर कधी मेट्रोत हस्तमैथुन करणारा तरुण .पण आता जो प्रकार घडला आहे त्यामुळे तर आता तरुणांत लाज उरली किंवा नाही अथवा आपण ही पाश्चात्य संस्कृतीकडे पूर्णतः वळलो की काय असे वाटायला लागले आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.ज्यात एक गे कपल ओरल सेक्स करताना दिसत आहे.

अतुल कृष्णन या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला होता जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. “दिल्ली मेट्रोमध्ये काय चालले आहे? पोलिसांनी कठोर कारवाई करावी अन्यथा आणखी व्हिडिओ समोर येतील” असे कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर केला होता. सुरुवातीला या घटना दिल्ली मेट्रोमधील आहेत का याची पुष्टी झालेली नव्हती मात्र आता हे व्हिडीओ समोर येताच डीएमआरसी (DMRC) ने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

हे व्हिडिओ समोर आल्यानंतर, डीएमआरसी (DMRC) म्हणाले- ‘आम्ही प्रवाशांना मेट्रोमध्ये प्रवास करताना जबाबदारीने वागण्याची विनंती करतो. इतर प्रवाशांनी असे आक्षेपार्ह वर्तन पाहिल्यास, त्यांनी ताबडतोब डीएमआरसी हेल्पलाइन क्रमांकावर कॉरिडॉर, स्टेशन, वेळ इत्यादी तपशील कळवावे.

दरम्यान, दिल्ली मेट्रोमध्ये हस्तमैथुन करणार्‍या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की त्यांनी आयपीसी कलम 294 अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे, या व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close