केसांना मेहंदी लावता तर मग करा ही गोष्ट मिळेल फायदा
आता लहान वयातच तरुण आव वा तरुणी केले पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. पांढऱ्या केसांमुळे सौंदर्य कमी होते. त्यासाठी मग केसांना डाय करणे, कलर करणे मेहंदी लावणे यासारखे उपाय केले जातात. पण केमिकल युक्त कलर वापरल्याने केस आणखी पांढरे होतात. त्यासाठी आपण हर्बल वस्तू चा वापर करू शकता. यात मेहंदी हे स्वस्त आणि मस्त प्रॉडक्ट आहे. मेहंदी केसांना कलरिंग करण्यासोबत कंडिशनिंग देखील करते. मेहंदी लावतांना त्यात दोन – चार थेंब बदाम तेलाचे टाका म्हणजे त्याचा केसांना भरपूर फायदा होईल.
केसांना मेहेंदी लावल्याचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात. केसांना मेहेंदी लावल्याने पांढरे केस लपवले जाणे, केस मुलायम होणे, केसांना शाईन येणे, केसांचा बिघडलेला पोत सुधारणे असे असंख्य बदल आपल्या केसांमध्ये दिसून येतात. आपल्यापैकी बरेचजण केसांना मेहेंदी लावतात तेच मुळात पांढरे झालेले केस कलरिंग करण्याच्या हेतूने. मेहेंदी केसांना लावल्यावर केसांना छान गडद रंग यावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी आपण मेहेंदीमध्ये अनेक प्रकारच्या नैसर्गिक, कृत्रिम गोष्टी मिसळतो. जर आपल्या केसांचे सौंदर्य वाढवायचे असेल आणि त्यांना रेशमी – चमकदार आणि मजबूत बनवायचे असेल, तर मेंहेंदीमध्ये बदामाचे तेल मिसळून मेहेंदीची पेस्ट तयार करावी. मेंदीमध्ये बदामाचे तेल मिसळण्याची पद्धत आणि ते केसांना लावण्याचे काही फायदे जाणून घेऊया).
मेंहेंदीमध्ये बदामाचे तेल नेमकं कोणत्या पद्धतीने मिसळावे…
केसांना मेहंदी लावण्यासाठी प्रथम एका भांड्यात कोमट पाणी घ्या. नंतर त्यात मेहंदीची पावडर घालून नीट मिक्स करून घट्ट द्रावण तयार करा. नंतर मेहंदीमध्ये बदामाच्या तेलाचे काही थेंब टाका आणि चांगले मिसळा आणि थोडा वेळ तसेच राहू द्यावे. आता केसांना मेहंदी लावा आणि तासभर ती केसांवर तशीच राहू द्या. यानंतर केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.
मेंहेंदीमध्ये बदामाचे तेल मिसळण्याचे फायदे :-
१. कोंड्यापासून सुटका :- बदामाचे तेल मेंहेंदीमध्ये मिसळल्याने कोंडा लवकर निघून जाण्यास मदत होते. वास्तविक, टाळूच्या कोरडेपणामुळे केसांत कोंडा तयार होतो. त्यामुळे अनेक वेळा केसांना खाज येण्याची आणि केस गळण्याची समस्या समोर येते. अशा स्थितीत मेंहेंदीमध्ये बदामाचे तेल मिसळल्यास टाळूची आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते, त्यामुळे कोंडा नाहीसा होऊ लागतो.
२. स्कॅल्प स्वच्छ ठेवण्यासाठी :- बदामाचे तेल टाळू स्वच्छ ठेवण्यास मदत करते. वास्तविक बदामाच्या तेलामध्ये असलेली जीवनसत्त्वे केसांसाठी उत्कृष्ट क्लिनिंग एजंट म्हणून काम करतात. त्यामुळे बदामाचे तेल मेंहेंदीमध्ये मिसळून लावल्याने टाळूवर घाण जमा होऊ देत नाही. यामुळे स्कॅल्प स्वच्छ राहते आणि केस मजबूत व बळकट होतात.
३. केसांची वाढ होते :- बदामाचे तेल मेंहेंदीमध्ये मिसळून लावल्यानेही केसांची वाढ चांगली होते. हे केस गळणे थांबवते आणि केसांच्या वाढीस गती देते. इतकेच नाही तर केसांच्या मुळांना बळकट आणि मजबूत बनवण्यातही हे खूप फायदेशीर ठरते.
४. केस निरोगी राहतील :- बदामाचे तेल मेंहेंदीमध्ये मिसळल्याने केस निरोगी होतात. मेंहेंदीमध्ये तेल मिसळून लावल्याने मेंदीचे पोषण दुप्पट होते. बदामाच्या तेलामध्ये असलेले व्हिटॅमिन A, B आणि E चे गुणधर्म टाळूचे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे केस निरोगी होतात तसेच त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडते.
५. केस होतात रेशमी – चमकदार :- केसांना मेंहेंदी लावल्याने केसांची चमक आपोआप वाढते. पण मेंहेंदीमध्ये बदामाचे तेल मिसळल्याने केसांची चमक अनेक पटींनी वाढते, जी दीर्घकाळ टिकून राहते.