हटके

वाघाने केलेल्या कृतीतून मनुष्य काही धडा घेईल काय ? 

Spread the love

पशूंना कळते मग मनुष्याला का नाही ? 

                  प्लास्टिक वापरावर बंदी असतांना अनेक ठिकाणी प्लास्टिक चा सर्रास वापर होतांना दिसतो. प्लास्टिक आरोग्यासाठी हानिकारक आहे असे वारंवार आंगण्यात येते. तरी देखील प्लास्टिक चा वापर कमी होताना दिसत नाही . लोकं वापरलेल्या प्लास्टिक पन्नी ,बाटल्या नदी नाल्यात फेकून देतात. नदी , नाले, तलाव साफ करण्यासाठी मग शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. पण एका वाघाने जे केले ते मानवाला का समजत व उमजत नाही ? असा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओ नंतर उपस्थित होत आहे.

छायाचित्रकार दीप काठीकर यांनी चित्रित केलेला एक  व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे,  या व्हिडिओत बाटली तोंडात धरून कॅमेऱ्याकडे चालणारा भव्य वाघ दिसतो. दीप यांच्या म्हणण्यानुसार, क्लिपमधील वाघ हे भानुसखिंडी वाघिणीचा बछडा आहे आणि हा व्हिडिओ जंगल स्वच्छ ठेवण्याच्या महत्त्वाबद्दल एक मोठा आणि स्पष्ट संदेश देतो.

“वाघाचा गोड हावभाव. आपण आपले जंगल स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू. भानुसखिंडी वाघीणीचा बछडा, रामदेगी हिल्स,” दिप यांनी 13 फेब्रुवारी रोजी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओला असे कॅप्शन दिले आहे.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर, व्हिडिओला इंस्टाग्रामवर 21k पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. या वन्यजीवाचे चित्र पाहून सोशल मीडिया यूजर्स मंत्रमुग्ध झाले आणि तितकेच दुःखही झाले.

“हे एकाच वेळी सुंदर आणि दुःखद चित्र आहे. मला लाज वाटते की, वाघाला आपण केलेली घाण साफ करावी लागले,” अशी एका यूजरने कमेंट केली.

“हा एक सुंदर व्हिडिओ आहे. चला आपल्या जंगलावर प्रेम करूया आणि ते प्लास्टिकमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करूया,” असे दुसरा यूजर म्हणाला.

“व्वा, किती शक्तिशाली व्हिडिओ आहे! प्लास्टिक बंदीच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवणारा हा आकर्षक व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सादर करण्यास पात्र आहे, जिथे त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होण्याची शक्यता आहे,” असेही एक यूजर म्हणाला.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close