ओबीसी आरक्षण बचाव महा समितीतर्फे घंटा आंदोलन
यवतमाळ वार्ता / अरविंद वानखडे
आज दिनांक 21 9 2023 ला स्थानिक यवतमाळ येथे महात्मा फुले चौकात ओबीसी आरक्षण बचाव महा समितीतर्फे ओबीसी प्रवर्गातील सर्व जातीसमूहातील संघटनांनी सहभाग नोंदविला असून सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला हरार पण करून घंटानंद आंदोलनाला सुरुवात केली
महाराष्ट्र शासनाची खेळी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही व मराठा समाजाला आरक्षणा देण्याच्या आश्वासनाला ऊत आला असून मराठा समाजामध्ये व कुणबी समाजामध्ये मतभेद निर्माण करण्याचा केविलवाणा प्रकार सरकारकडून चालविल्या जात आहे ओबीसी आरक्षण संपविण्याचा कट हाणून पाडला पाहिजे ओबीसी मध्ये आधीच 346 जाती असून मराठ्यांची ओबीसी मध्ये होणारी घुसखोरी थांबली पाहिजे ओबीसी जातीनिहाय जनगणना त्वरित झाली पाहिजे अशा प्रकारच्या अनेक मागण्या चे मनोगत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली गावंडे सर संजय भाऊ देशमुख जितेंद्र हिंगासपुरे वोडापे साहेब इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते