हॉटेल च्या रूम मध्ये 22 तरुणी आणि एका तरुणाला पाहून सगळेच चक्रावले

तरुणीत विदेशी आणि नेपाळ च्या मुलींचा समावेश
नवी दिल्ली / नवप्रहार ब्युरो
दिल्ली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिस जेव्हा संबंधित हॉटेल मध्ये पोहचले तेव्हा हॉटेल च्या एका रूम मध्ये 22 तरुणींसह एका तरुणाला पाहून उपस्थितांसह पोलिसही चक्रावले. पण सत्य समोर येताच ॲक्शन मोड मध्ये येऊन त्यांना अटक केली. तरुणींमध्ये उजबेकिस्तान आणि नेपाळसह भारतातील काही तरुणींचा समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या सर्व मुली दिवसा झोपतात आणि रात्री स्कुटीवरुन डिलिव्हरी देण्यासाठी जाता. 700 ते 7000 रुपये घेऊन देहविक्री करतात. हा धंदा राजधानी दिल्लीत उघडपणे हा धंदा सुरु होता. चौकशी केल्यानंतर समजलं की, झोमॅटो आणि स्विगीचे ऑर्डर देण्यात आल्यानंतर डिलिव्हरी बॉय स्कुटीवरुन तरुणींना हॉटेलवर पोहोच करायचे आणि नंतर माघारी न्यायचे.
पहाडगंजमधील काही हॉटेल्स आणि घरांमध्ये तरुणींना डांबून ठेवत त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी चुना मंडी येथील ‘येस प्लीज’ आणि ‘गॉड इन’ हॉटेलवर छापा टाकला. एका दुमजली इमारतीवरही छापा टाकण्यात आला. या कारवाईत एक अल्पवयीन मुलगा आणि एका उझबेकिस्तानी मुलीसह 22 तरुणींना (Delhi police arrest 22 girls) ताब्यात घेण्यात आलंय.
नेपाळ आणि उजबेकिस्तानच्या तरुणींकडूनही देहविक्री
एका एनजीओने मध्य दिल्लीचे डीसीपी हर्षवर्धन यांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर मध्यरात्री छापा टाकण्यात आला. या रॅकेटचे सूत्रधार निजाम आणि रेहान फरार झाले. हे नेटवर्क दोघेही चालवत होते आणि घरासाठी करण्यात आलेला करार देखील त्यांच्या नावावर होता. सध्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. तपासादरम्यान हॉटेल ‘येस प्लीज’मधून तीन तर ‘गॉड इन’मधून चार मुलींची सुटका करण्यात आली. याच धर्तीवर चुना मंडीच्या इमारतीतून 16 मुलींना ताब्यात घेण्यात आलंय. नेपाळ, आसाम आणि पश्चिम बंगालमधून या मुली आणण्यात आल्या होत्या.
700 ते 7 हजार रुपयांत तरुणींकडून देहविक्री
मुलींना 5 ते 10 मिनिटांसाठी पाठवण्यात येत होते आणि त्यासाठी त्यांच्या क्लाईंटकडून 700 ते 10 हजार रुपये आकारण्यात आले. आर्थिक मजबुरी आणि भावनिक दुर्बलतेमुळे मुलींना या व्यवसायात ढकलण्यात आले. 5 मुलींनी याबाबतचा खुलासा केल्यानंतर पोलीस आता त्यांचं संपूर्ण नेटवर्क तोडण्यासाठी आणि फरार मास्टरमाईंडला पकडण्यासाठी छापे टाकत आहेत.