विदेश

असे पडले सिरियाचे राष्ट्राध्यक्ष देशाबाहेर 

Spread the love

सीरिया  /  एनपी इंटरनॅशनल डेस्क

                    सिरीयात तख्तापालट झाला आहे. बंडखोरांनी देशावर ताबा मिळवला आहे. परिस्थिती नाजूक असताना सिरियाचे राष्ट्राध्यक्ष असद आणि त्यांचे कुटुंब सुखरूप देशाबाहेर पडले. लक्षणीय बाब अशी की अमेरिकेला देखील याची भनक लागली नाही. हे कसे काय घडले असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चला तर जाणून घेऊ या या घटनेबद्दल .

यावेळी केवळ बंडखोरांचे लक्ष भरकटवण्यासाठी देशातून पलायन करत असलेल्या असद यांचे विमान कोसळल्याची अफवा पसरवली गेली. या नंतर, असद आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो समोर आले आणि ते रशियाला पोहोचल्याची पुष्टी झाली. आता या घटनेनंतर असद आपल्या कुटुंबासह एवढ्या शांतपणे सीरियातून रशियाला कसे पोहोचले याची संपूर्ण स्टोरी समोर आली आहे.

रशियामध्ये असद सुरक्षित –
सीरियाचे पदच्युत राष्ट्रपती बशर अल-असाद यांच्यासंदर्भात रशियाचे उप परराष्ट्रमंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी एका मुलाखतीत माहिती दिली आहे. बशर अल-असद यांना अत्यंत सुरक्षितपणे रशियात पोहोचवण्यात आले आहे. ते रशियामध्ये असून सुरक्षित आहेत.” मात्र, त्याच्यासोबत कोणकोण आहेत? याचा खुलासा झालेला नाही.

पुतिन यांचा मास्टर प्लॅन –
पुतिन यांनी असाद यांना सीरियातून बाहेर काढण्यासाठी खास प्लॅन केला होता. त्यांनी असद यांना खाजगी विमानाने बाहेर पडण्यास सांगितले. हे विमान दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे होते. बंडखोरांनी दमास्कसमध्ये प्रवेश करताच ही कारवाई सुरू करण्यात आली. यासाठी प्रथम असाद आणि त्याच्या कुटुंबियांना अत्यंत कडेकोट सुरक्षेत जीवनावश्यक वस्तूंसह दमास्कस विमानतळावर नेण्यात आले. यावेळी, दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याच्या सुरक्षिततेसाठी डझनावर वाहने उपस्थित होती. सीरियन सैन्यही तेथे होते. यानंतर असद आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमानात बसवण्यात आले आणि काही मिनिटांतच विमान रशियासाठी रवाना झाले.

विमान क्रॅश झाल्याची अफवा अन्…-
यानंतर, असाद यांना घेऊन जाणारे विमान क्रॅश झाल्याची अफवा पसरवण्यात आली. असे केवळ बंडखोरांचे लक्ष भरकटवण्यासाठी करण्यात आले. यानंतर मॉस्कोने ‘ट्रान्सपॉन्डर ट्रिक’ वापरून असद यांना सीरियाच्या किनारपट्टीवरील हवाई तळातून नेण्याची व्यवस्था केली.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, “असद यांना, विमानाचे टेक ऑफ झाल्यानंतर काही वेळानंतर, त्याचा ट्रान्सपॉन्डर बंद करण्यास सांगण्यात आले. यानंतर विमान सीरियन तटावर रशियाच्या खमीमिम हवाई तळापर्यंत गेले. यासाठी विमानाने मोठा यूटर्नदेखील घेतला होता. यानंतर, खमीमिम एअरबेसवर आधीपासूनच तैनात रशियन सैनिकांच्या विमानाने असद आणि त्याच्या कुटुंबाला मॉस्‍कोमध्ये पाठवण्यात आले.

रशिय एजन्सीने असद यांना पटवलं –
माध्यमांनी क्रेमलिनच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या महितीनुसार, बंडखोरांकडून त्याचा पराभव होणार हे स्पष्ट होताच, रशियन सरकारसाठी काम करणाऱ्या एजंटांनी असद यांना ताबडतोब देश सोडण्यासाठी पटवले. याच बरोबर पूर्वनियोजित कारवाईनुसार त्याला देशातून बाहेर काढण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close