अपघात

 भीषण अपघात ; शाळेची बस उलटली, पाच मुलांचा मृत्यू तर 15 जखमी 

Spread the love

हरियाणा / नवप्रहार डेस्क

                   हरियाणा राज्यातील महेंद्रगड मधील कनिना मधील उनहनी गावाजवळ स्कुल बस उलटून झालेल्या भीषण अपघातात 5 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर 15 बालक जखमी झाले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे  शाव घेतली आहे. 

जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हरटेक करण्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. गंभीर जखमी मुलांना रेवाडी येथे रेफर करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालक दारूच्या नशेत होता. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचारासाठी महेंद्रगड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close