क्राइमविदेश

भयानक…. प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या करून मृतदेहाचे केले 15 तुकडे

Spread the love

2 महिन्यांपर्यंत मृतदेहाचे तुकडे फ्रीज मध्ये ठेवले 

मृत्यू नंतरही अभिनेत्री लोकांसाठी ऑनलाइन होती जिवंत

 इटली / नवप्रहार ब्युरो 

                     पोर्नोग्राफीक सिनेमात काम करणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा खून करून तिच्या मृतदेहाचे 15 तुकडे करून ते 2 महिने  फ्रीज मध्ये ठेवण्यात आले होते. पण आश्चर्याची बाब म्हणजे मृत्यू होऊन दोन महिने उलटया नंतर देखील ती जनतेत जिवंत होती. तिच्या मित्रमंडळी कडून फोन केला जायचा तेव्हा पलीकडून मी फक्त व्हाटस अप चाट द्वारेच बोलू शकेल असा मॅसेज यायचा. पण 2 महिने उलटून देखील ती फोन उचलत नसल्याने मित्रांना संशय आला आणि या भयानक हत्याकांडाचा खुलासा झाला.

पोर्नोग्राफिक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या हत्या करण्यात आलेली. अंगावर शहारे आणणारी ही कथा आहे, एका अभिनेत्रीची जिच्या मृत्यूनंतरही ती ऑनलाईन लोकांसाठी जिवंती होती. तिच्या मृतदेहची विटंबणा करण्यात आली. तिच्या शरीराचे तुकडे-तुकडे करण्यात आले. तरीसुद्धा ती मात्र, जगासमोर जिवंतच होती. पायाखालची जमीन सरकवणारी प्रसिद्ध अभिनेत्रीची ही कहाणी तुम्हाला हादरवून सोडेल.

दोन महिन्यांपूर्वीच मृत्यू होऊनही अभिनेत्री जगासमोर मात्र जिवंत होती, एका पार्टीदरम्यान, या गोष्टीचा खुलासा झाला होता. ही अभिनेत्री आहे, प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री कॅरोल माल्टेसी.

 इटलीतील प्रसिद्ध पॉर्नस्टार होती. तिला  या नावानंही ओळखलं जात होतं. वयाच्या फक्त 26 व्या वर्षी तिनं पॉर्न इंडस्ट्रीवर ताबा मिळवला होता. कित्येक लाख लोक तिला फॉलो करत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  खूप अडल्ट व्हिडीओ शूट करायची. त्यामुळे फारच कमी वेळात प्रसिद्ध झाली होती. पण, मार्च महिन्यात तिला एका पार्टीत जायचं होतं, जिथे तिच्यासोबत इतरही सेलिब्रिटी येणार होत्या.

मात्र, अभिनेत्रीला तिच्या काही मित्रमैत्रिणींनी फोन केला, त्यावेळी तिनं कॉल उचलला नाही. त्यानंतर तिच्या फोनवरुन मेसेज आला की, ती कुणाचाच फोन उचलू शकणार नाही. फक्त आणि फक्त व्हॉट्सॲप चॅटद्वारेच बोलू शकेल. पण, एक, दोन दिवस नाहीतर, दोन महिने  अभिनेत्री फोन उचलू शकत नव्हती. हळूहळू लोकांना संशय येऊ लागला आणि त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना विचारणा करण्यात आली. कुटुंबियांनी सांगितलं की, त्यांचंही बऱ्याच दिवसांपासून अभिनेत्रीशी बोलणं झालेलं नाही. त्यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

पोलिसांनी Charlotte Angie चा तात्काळ तपास सुरू केला. त्यानंतर एक दिवस बातमी आली की, एका व्यक्तीला निर्जन ठिकाणी 15 वेगवेगळ्या काळ्या पॉलिथिन बॅग्जमध्ये एका तरुणीच्या शरीराचे तुकडे सापडले होते. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचा पंचनामा करत असताना पाहिलं की, मृतदेहाचे अनेक तुकडे केले गेले होते. तसेच, चेहरादेखील वाईट पद्धतीनं ठेचलेला होता. सापडलेल्या मृतदेहाच्या अंगावर ठिकठिकाणी टॅटू काढण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मीडियाची मदत घेण्याचं ठरवलं. त्यानंतर एका पत्रकारानं मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह पॉर्न स्टार शार्लोट अँजीचा असल्याचं जाहीर करण्यात आलं. पत्रकारानं अभिनेत्रीच्या टॅटूवरुन ओळख पटवली होती.

Charlotte Angie ला पत्रकारानं तिची विचारपूस करण्यासाठी अनेकदा मेसेज केला होता, त्यावेळी अभिनेत्रीच्या व्हॉट्सअॅपवरुन रिप्लाय यायचा की, मी ठीक आहे. पण, त्यावेळी पत्रकाराचं डोकं चक्रावलं. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तो रिप्लाय कसा देऊ शकतो. त्यावेळी अभिनेत्रीच्या कुटुंबियांशी चर्चा केली. त्यावेळी आणखी काही माहिती समोर आली, कुटुंबीयांनी सांगितलं की, तिच्या घराचं भाडं आणि इतर काही पेमेंट ऑनलाईन केले जात आहे. मात्र, अभिनेत्री बेपत्ता आहे. त्यावेळी खुलासा झाला की, अभिनेत्रीचा मोबाईल फोन दुसरंच कुणीतरी चालवत होतं. पोलिसांनी हा नंबर ट्रेस केला, त्यावेळी समजलं की, एक 43 वर्षांची व्यक्ती अभिनेत्रीचा मोबाईल चालवत आहे. त्यावेळी पोलिसांनी त्या व्यक्तीच्या बॅग्जची झाडाझडती घेतली, त्यावेळी अभिनेत्रीच्या मृतदेहाचे तुकडे ज्या बॅग्जमध्ये भरुन फेकले गेले होते. त्या बॅग्ज त्या व्यक्तीच्या घरात आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीच्या हत्येच्या आरोपाखाली व्यक्तीला अटक केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close