भयानक … लिफ्ट थांबवन्याच्या नादात हाताचे झाले दोन तुकडे

मोठ्या इमारतीमध्ये जनतेच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून लिफ्ट लावलेली असते. मोठ्या शहरात अनेक मजली इमारती असल्याने लिफ्ट लावणे आवश्यक असते.पण सुविधेसाठी लावलेल्या याच लिफ्ट मुळे जर अपंगत्व येत असेल तर आग काय ? लिफ्ट थांबवन्याच्या नादात एका व्यक्तीच्या हाताचे दोन तुकडे झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
त्याने लिफ्टमधून हात बाहेर काढताच लिफ्टचा दरवाजा बंद झाला अन त्याचा हात शरीरापासून वेगळा झाला. हात तुटून खाली जमिनीवर पडला.
व्हिडिओमध्ये दिसतंय की, एक माणूस हाताच्या साहाय्याने लिफ्ट थांबवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, असं करणं त्याच्यासाठी जीवघेणं ठरलं आहे. लिफ्ट थांबण्याच्या नादात तो त्याचा हात गमावून बसला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगामध्ये व्हायरल होत आहे. लिफ्ट अपघाताचे आतापर्यंत अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.
व्हिडिओमध्ये दिसतंय की, लिफ्ट थांबवण्याचा प्रयत्न करत असताना या व्यक्तीचा एक हात कापला गेला आहे.लिफ्ट थांबताच एक व्यक्ती त्यामध्ये प्रवेश करते. मग लिफ्ट थांबणार इतक्यात, त्या व्यक्तीने लिफ्ट थांबवण्याच्या उद्देशाने त्याचा एक हात बाहेर काढला. परंतु लिफ्ट न थांबता त्याचा हातच तुटून बाहेर पडला आहे. त्याचा हात लिफ्टमध्ये अडकून कट झाला.यानंतर लिफ्ट वर गेली, मात्र,त्या व्यक्तीचा हात कापला गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. साम टीव्ही या घटनेची पुष्टी करत नाही.
या भीषण घटनेचा व्हिडीओ x या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @TriShool_Achuk नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे.’कृपया लिफ्ट थांबवण्यासाठी तुमचे हात किंवा पाय मध्यभागी ठेवू नका. सेन्सर काम करत नसेल तर मोठी दुर्घटना घडू शकते, असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
हा व्हिडिओ ३० सेकंदाचा आहे. आतापर्यंत 6 लाख 87 हजारांहून अधिक वेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. हजारो लोकांनी या व्हिडीओ ला लाईक केलं आहे. या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत (Viral) आहेत. एका यूजरने लिहिलंय की, हात कापल्यानंतर हातातून रक्त निघाले नाही. त्यात कोणतीही हा तर दुसऱ्या एका युजरने लिहिलंय की, ‘हात बनावट दिसत (Viral News) आहे’.
आज जग तंत्रज्ञानाच्या जोरावर चालत आहे. उंच इमारतींमध्ये लिफ्ट्स बसवल्या जातात. जेणेकरून लोकं आरामात वर-खाली जाऊ शकतील. या लिफ्ट्स आपल्यासाठी जितक्या सोयीच्या आहेत तितक्याच धोकादायक आहेत. अनेकदा या लिफ्टस् अपघाताचे कारण देखील बनतात. अशाच एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.