अपघात

भीषण अपघात ; बस टँकर ला कापत गेली 20 प्रवाश्यांचा मृत्यू , 30 गंभीर जखमी 

Spread the love

रस्त्यावर मृतदेहाचा खच, सामान आणि छापलांचे ढीग

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

उन्नाव  / नवप्रहार डेस्क 

                     लखनऊ आग्रा मार्गावर झालेल्या भीषण अपघाताने अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रवाश्यांनी भरलेल्या डबल डेकर बस  ओव्हर टेक करण्याचा नादात टँकर ला जाऊन भिडल्याने ती टँकर ला।कापत गेली. त्यामुळे 18 प्रवाश्यांचा जागीच तर 2 लोकांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर 30 प्रवाशी गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनास्थळावर मृतदेहाचा खच, सामान आणि चपला जोड्यांचा ढीग असे मन हेलावून टाकणारे दृश्य होते.

 

 

उत्तर प्रदेशातील लखनऊ-आग्रा एक्सप्रेस वेवर बुधवारी पहाटेच्या वेळी बसला भीषण अपघाता झाला. या अपघातात 18 जणांचा जागीच तर 2 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 30 जण गंभीर जखमी आहे त्यामुळे मृत्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या भीषण अपघाताचे व्हिडीओ समोर आले आहेत.

बिहारच्या सीतामढी जिल्ह्यातील प्रवाशांना घेऊन डबल डेकर बस दिल्लीच्या दिशेने निघाली होती. जेव्हा बस उन्नाव जिल्ह्याच्या सीमाभागात पोहोचली तेव्हा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दूध टँकरला जाऊन धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बस टँकरला कापत पुढे गेली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नावमधील अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातावर शोक व्यक्त केला. उन्नाव दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. तर जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार आहे.

मृत्यूचा तांडव पाहून ग्रामस्थांसह कुटुंबिय भयभीत झाले आहेत. उन्नावचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू केला आहे. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरु आहे. दरम्यान मृतांमध्ये 14 पुरुष प्रवाशांसह दोन महिला आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा हा अपघात झाला तेव्हा आजूबाजूच्या गावातील लोकांना एखादा बॉम्बस्फोट झाला असं वाटलं. त्यामुळे या अपघाताची बातमी वाऱ्यासह पसरली.

अपघाताच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मी शेताकडे जात होतो. यावेळी मोठा आवाज झाला. लोक स्वतःला वाचवण्याची विनंती करत होते. ते ओरडत होते. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा 50-60 लोक जमले होते. अपघात पाहून सर्वांचाच आत्मा हादरला. 10 लोक रस्त्यावर पडले होते. इतर वेदनेने ओरडत होते. पोलीस आले आणि जखमींना रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उन्नावमधील भीषण रस्ता अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या घटनेवर राष्ट्रपतींनी एक संदेश जारी केला आहे. राष्ट्रपती म्हणाले की, उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर झालेल्या रस्ते अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. अशा आकस्मिक मृत्यूचे बळी ठरलेल्या लोकांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमी लोकांच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close