क्राइम

मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी पत्नीवर दबाव त्यानंतर पतीने केले असे ….

Spread the love

लखनऊ / नवप्रहार डेस्क

              मित्रांसोबत सबंध ठेवण्यासाठी पती पत्नीवर दबाव टाकत होता. तिने नकार दिल्यावर तिची सुपारी देऊन हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तीन वर्षानंतर हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. आणि आरोपींना अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीनेच आपल्या पत्नीची सुपारी देऊन हत्या करण्यास सांगितलं होतं. आरोपी आपल्या पत्नीवर त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकत होता. मात्र, पत्नी हे करण्यास नकार देत होती. याच कारणामुळे पतीने पत्नीच्या हत्येची सुपारी दिली आणि तिचा मृतदेह गौतमबुद्ध नगर क्षेत्रात फेकला. क्राईम ब्रांच आणि विजयनगर पोलिसांनी अखेर या हत्या प्रकरणाचा उलगडा केला आहे.

डीसीपी सिटी राजेश कुमार यांनी सांगितलं की, बागपतच्या पावला खेडी गावात राहणाऱ्या फिरदौसचा विवाह विजयनगर पोलीस स्टेशन हद्दीतील मिर्झापूर गावातील रहिवासी इंतेजार उर्फ ​​इंतूशी झाला होता. लग्नानंतर फिरदौस आणि इंतजार यांच्यात भांडणं सुरू झाली, त्यामुळे 2020 मध्ये फिरदौसने विजयनगर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. याशिवाय खर्चाचा दावाही कोर्टात दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात इंतजारचे भाऊ आणि पुतण्यांनाही आरोपी करण्यात आलं होतं.

डीसीपीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात फिरदौसने आरोप केला होता की तिचा पती तिच्यावर मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. तिच्या पतीचे मित्र आणि पुतण्याने तिच्या मुलींवर वाईट नजर ठेवली. याच कारणामुळे फिरदौस पतीपासून विभक्त झाली होती आणि मुलांसह एकाच घरात राहत होती. या प्रकरणामुळे इंतजार, त्याचे भाऊ आणि पुतणे त्रस्त झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. याच कारणावरून इंतजारने पुतण्या शादाबसोबत मिळून फिरदौसचा खून करण्याचा कट रचला.

शादाबने इंतजारची गावातील गुंड सोनू, परवेझ, जेपी उर्फ ​​अर्शद, नौशाद आणि सलीम यांच्याशी ओळख करून दिली आणि त्यांना पाच लाखांमध्ये हत्येचं कंत्राट दिलं. इंतजारने प्लॉट विकून सुपारीची रक्कम दिली होती. फिरदौसच्या नावावर एक प्लॉट होता, तो विकण्यासाठी इंतजार दबाव निर्माण करत होता. फिरदौसच्या वडिलांना दिलेले 12 लाख रुपये त्यांनी परत न केल्याने तो फिरदौसला मारहाण करायचा. दरम्यान, इंतजार, शादाब खान आणि त्याचा सहकारी परवेज यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेत सहभागी असलेला नौशाद एका दरोड्याच्या गुन्ह्यात तुरुंगात आहे. तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

अलीकडे इंतजार आणि शादाब दारूच्या नशेत होते आणि फिरदौसच्या हत्येबद्दल बोलत होते. मुलीने हे ऐकलं होतं. मुलीने बहिणीला सांगितल्यावर तिनेही गप्प राहणंच योग्य मानलं. जर इंतजार आणि शादाबला हे कळलं तर ते त्यांनाही मारतील अशी भीती त्यांना वाटत होती. मात्र, मुलगी फिजाने ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचवली, त्यानंतर गुन्हे शाखा आणि पोलीस सक्रिय झाले. इंतजारने चौकशीदरम्यान गुन्हा कबुल केला.

डीसीपींच्या म्हणण्यानुसार, 1 नोव्हेंबर 2021 रोजी फिरदौस तिच्या मुलीला शाळेत सोडल्यानंतर घरी परतत होती. वाटेतच गुंडांनी तिचं अपहरण केलं होतं. आरोपी परवेझने सांगितलं की, तो फिरदौसला नोएडा येथे घेऊन गेला आणि सीट बेल्टने गळा दाबून तिची हत्या केली. नंतर ते मृतदेह रबुपुरा येथे टाकून परत आले. योजनेनुसार, इंतजारने दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली, परंतु पोलीस फिरदौसचा शोध घेऊ शकले नाहीत. आता अखेर या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close