डाँ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या *प्रतीक सगणे तीन सुवर्ण पदकाने एक रौप्य पदकाने सन्मानित
दर्यापुर- कैलास कुलट
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आज झालेल्या ३९ व्या दीक्षांत समारंभात . विधी
पदवी या परीक्षेत विद्यापीठातून सर्व प्रथम आल्याबद्दल डाँ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी अँड प्रतीक संजय सगणे याला ३ सुर्वण पदक त्यामध्ये पहीले सुवर्ण पदक ६० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करून प्रथम स्थान प्राप्त केल्याबद्दल स्व.श्री.ए.एस. उपाख्य काकासाहेब आठल्ये सुवर्णपदक दुसरे सुवर्ण पदक गुणवत्तेनुसार प्रथम स्थान प्राप्त केल्याबद्दल बॅ.टी.एस. पाटील सुवर्णपदक सर्वाधिक गुण प्राप्त करून प्रथम स्थान प्राप्त केल्याबद्दल
स्व.सौ.चंपादेवी सुखदेवजी मालाणी स्मृती रौप्यपदक पदकाने सन्मानित केले. या त्याच्या यशामुळे अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.तो आपल्या यशाचे श्रेय आई—वडील व गुरुंजनाना देत आहे.या यशाबदल
प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन
केले आहे.