शैक्षणिक

आर जे चवरे विद्यालयाचे होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत नेत्रदीपक यश

Spread the love

 

कारंजा प्रतिनिधी डॉ. गुणवंत राठोड

*दिनांक 7 एप्रिल 2024 रविवार रोजी* होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेचा अंतिम फेरीचा निकाल घोषित झाला. त्यामध्ये आर जे चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंट मधील वर्ग नववीचा विद्यार्थी *अथर्व ठाकरे याने सुवर्णपदक व सई धोटे हिने कांस्यपदक* प्राप्त केले वर्ग सहावी मधून पार्थ तायडे, पार्थ बगडे यांनी रजतपदक तर *वेद कस्तुरे, वरद जमाले, विराज गोफणे यांनी कांस्य पदक* प्राप्त करून विद्यालयाच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या विद्यार्थ्यांचा मुंबई येथे वैज्ञानिक डॉक्टर प्रियदर्शनी कर्वे, डॉक्टर सुनील कांबळे ,होमी भाभा डायरेक्टर श्री चव्हाण सर तसेच त्यांच्या संपूर्ण टीमने *मेडल व प्रमाणपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरव केला*.*उल्लेखनीय बाब*
म्हणजे वाशिम जिल्ह्यातून सर्वात जास्त मेडल मिळवणारी आर जे चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंट *एकमेव शाळा* आहे. *संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अथर्व सुनील ठाकरे याला होमी भाभा बक्षीस समारंभात इतिहासात प्रथमच विद्यार्थ्याला मत मांडण्याची संधी देण्यात आली*.
मुंबई येथे त्याने आपल्या खास शैलीत आपले मत व्यक्त करून सर्वांना कारंजा लाड व आर जे चवरे हायस्कूलची ओळख करून देत आपल्या वक्तृत्व शैलीची मुंबई येथे छाप पडली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे कारंजा एज्युकेशन सोसायटी चे सचिव श्री अमोलभाऊ चवरे, सदस्य, जे सी हायस्कूलचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आर जे चवरे हायस्कूल व कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close