क्राइम

घरफोडी करणारा अटटल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद.

Spread the love
वरुड / दिनेश मुळे 
                         घरात कोणी नसल्याची संधी साधत दरवाज्याची कडी तोडून घरातील कपाटात असलेले सोन्या चांदीचे दागीने आणि रोख रक्कम असा ऐकून 1 लाख 57 हजारांचा माल चोरून नेला होता. त्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात एलसीबी ला यश आले आहे.
उपलब्ध माहीती नुसार मोहम्मद ईशाक मोहम्मद युनूस, वय 50 वर्ष, रा. बालासुंदरी मंदिराजवळ, शेंदुरजना घाट, ता. वरूड जि. अमरावती हे  दिनांक 19/10/2023 रोजी  बाहेरगावी गेले असता, कोणीतरी अज्ञात आरोपीने दि. 18/10/2023 चे रात्री पासून ते दि. 19/10/ 2023 चे सकाळ दरम्यान त्याच्या घराचे दरवाज्याचे कुलुप कोंडा तोडुन घरातील कपाटातील सोन्या चांदीचे दागीने व रोख रक्कम असा एकूण 1,57,500/- रू. चा मुद्देमाल चोरी केला आहे. अशा फिर्यादिच्या फिर्याद वरून पोलिस स्टेशन शेंदुरजना घाट येथे गुन्हा रजि के 394 / 23 कलम 457,380 भादवीचा गुन्हा दाखल करूण तपासात घेण्यात आला आहे.
दिनांक 20/10/2023 रोजी गोपनिय माहीती मिळाली की. महेश लोनारे, नामक इसम हा सोन्या चांदीचे दागीने घेवुन विकी करीता वरूड ते धनोडी रोडवरील साईकृपा हॉटेल जवळ विचारपुस करीत आहे अशा माहीती वरून आम्ही वरूड ते धनोडी रोडवरील साईकृपा हॉटेल जवळ जाऊन गोपनीय खबरे प्रमाणे संशईत इसम हा त्याचे शाईन मोटार सायकलवर महेश गजानन लोनारे वय 27 वर्ष रा जामगाव ता नरखेड जि नागपुर यास ताब्यात घेऊन त्यास विचारपुस केली असता तो उड़वा उडविचे उत्तर देवु लागला त्यास विश्वासात घेवुन अधीक विचारपुस केली असता त्याने दिनांक 17/10/2023 ते दिनांक 18/10/2023 रोजी दरम्यान शेंदुरजना घाट येथील एका घरात आणि बालासुंदरी देविच्या मंदिरात चोरी केल्याची कबुली दिल्यावरूण त्याचे ताब्यातुन सोन्याचे दागीने 14,460 ग्राम व चांदीचे दागीने 130 ग्राम जुना वापरता poco कंपनिचा 01 अॅन्ड्रॉईड मोबाईल फोन आणि आरोपीच्या ताब्यातील 01 होंडा शाईन कंपनिची मोटार सायकल कमांक एम.पी. 48 एन.ए. 5879 व नगदी रोख रक्कम असा एकूण 1,40,920 /- रू. व चा मुद्देमाल जप्त करूण ताब्यात घेतला आहे.
नमुद आरोपीने अमरावती ग्रामीन पोलिस अभिलेखाची पाहनी केली असता नमुद आरोपीने अमरावती ग्रामिण घटकातील 1) पोलिस स्टेशन शेंदुरजना घाट गुन्हा रजि क 394 / 2023 कलम 457, 380 भादवि. 2) पोलिस स्टेशन वरूड गुन्हा रजि. क. 456 / 2023 कलम 457, 380 भादवि 3) पोलिस स्टेशन वरूड गुन्हा रजि क. 503/2023 कलम 379 भादवि आणि 4) पोलिस स्टेशन वरूद्ध गुन्हा रजि. क. 591 / 2023 कलम 457, 380 भादवि चे गुन्हे उघडकीस येत आहे..
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मा. श्री. अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. शशीकांत सातव याचे मार्गदर्शनात पो.नि. किरण वानखडे यांच्या नेत्तृवात पोउपनि नितीन चुलपार, शेख तस्लीम मुलचंद भांबुरकर सपोउपनि संतोष मुदाने, पोहेकॉ बळवंत दाभणे, रविद्र बावणे, भुषण पेठे, मंगेश लकडे, चंदशेखर खंडारे, सचिन मसांगे, पोकॉ पंकज फाटे, चालक पोना हर्षद घुसे, मंगेश मानमोठे यांनी केली. असुन पुढील तपास पोलीस स्टेशन शेदुरजना घाट करीत आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close