हिवरखेड येथील सरस्वती प्राथमिक शाळेचे सप्तरंग वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न …!
हिवरखेड / प्रतिनिधी
स्थानिक सरस्वती प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर शाळेमधील *16वे सप्तरंग* 2025 वार्षिक स्नेहसंमेलन हिवरखेड येथील *इंद्रायणी चित्रमंदिर* येथे गुरूवार दि.30 जानेवारी 2025 रोजी मोठ्या थाटात संपन्न झाले.
शाळेमध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते.
विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनाची २०ते२५ दिवस नृत्य व्यवस्थित व्हावे यासाठी मेहनतीने सराव केला.
सप्तरंग स्नेहसंमेलन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले हिवरखेड येथील माजी सरपंच्या मा. सौ.वैशालीताई गणेश वानखडे, कार्यक्रमाचे उद्घाटक हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा.गजाननजी राठोड साहेब,प्रमुख उपस्थिती मध्ये संस्थेचे अध्यक्ष मा.रमेशचंद्र गुप्ता,संस्थेचे सचिव मा.सतिष राऊत,जेष्ठ संचालक मा.अनिल कराळे मा.भुषन सतिष राऊत (संस्था उपाध्यक्ष) अरुण कवळकार, मा.प्रमोद पोके (केंद्रप्रमुख हिवरखेड), मां.शिरसाट साहेब(शाखाधिकारी हिवरखेड)मां.डॉ. प्रशांत इंगळे तसेच श्री. गजानन वाली (अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती) विनायकराव माणिक(उपाध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती),संजू मानके, दीपक राऊत,उपस्थित होते.
प्रसंगी शाळेच्या पहिल्या बॅच मधील अतिशय तल्लक बुद्धिमत्ता असलेली विद्यार्थिनी जिचा शालेय प्रत्येक उपक्रमात,कार्यक्रमात,स्पर्धेत प्रथम क्रमांक यायचा आपल्या परिस्थितीवर मात करून जिने एम.एस. सी.केमिस्ट्रीमध्ये संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी मधून चतुर्थी व अकोला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करून हिवरखेड वासियांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला अशी शाळेची माजी विद्यार्थी *कु.योगिता शंकरराव चव्हाण* ही उपस्थित होती, तसेच सावित्रीबाई फुले यांच्यासोबत काम करणारी पहिली मुस्लिम महिला शिक्षिका आदिवासी यांचा वारसा आदर्श पुढे चालवणाऱ्या हिवरखेडच्या कन्या *कु.सीमा अंजुम मो. शेफाकत व कु.आसमा फरहीन मो.शेफाकत* या दोन विद्यार्थिनींनी, सीमा हिने सीटीईटी मध्ये 97 मार्क्स मिळवले व आसमा हि अमरावती यूनिवर्सिटी मधून इतिहास विषयात मिरीट आली. यानिमित्त शाळेच्या व संस्थेच्या तर्फे या तिन्ही विद्यार्थिनींचा भव्य सत्कार घेण्यात आला.
प्रसंगी शाळेतिल विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट पणे चित्तथरारक नृत्य मान्यवरांसमोर सादर केले.आमच्या विद्यार्थ्याचे नृत्य पाहण्यासाठी गावातील प्रतिष्ठीत नागरिक,महिला,शाळेतील विद्यार्थी पालक वर्ग तसेच मोठ्या संख्येने गावातील युवक वर्ग उपस्थित होता.
शाळेतील चिमुकल्यांनी देशभक्तीपर गीत, समाजसुधारकाच्या जीवन चरित्रावर आधारित गीते, चित्रपट गीते,बालगीत,गोंधळ गीत, महाराष्ट्रातील पारंपरिक गीतावर विद्यार्थ्यांनी बहारदार व चित्त थरारक नृत्य सादर केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे नृत्यांचे कौतुक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पालक वर्ग व गावातिल नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शसुनिल सोळंके व गौरव कौलकार सर यांनी केले व आभार प्रदर्शन हर्षल धर्माळ सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक *श्री.अमोल भोंगाळे सर* यांनी विशेष प्रयत्न केले तसेच सहाय्यक शिक्षक श्री.अनिल कवळकार सर,श्री.सतिष खेट्टे सर, सर,श्री.दिपक धारपवार सर,व ज्यांनी १५ते२०दिवसापासुन मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला अशा आमच्या शाळेतील पदविधर शिक्षिका सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सौ.प्रिया राऊत मॕडम यांनी अतिशय महत्त्वाची भुमिका पार पाडली.