हिवरखेड येथे इंग्रजी विषयाची कार्यशाळा संपन्न.

रमेश दुतोंडे यांचा पुढाकार.
बाळासाहेब नेरकर कडुन
हिवरखेड (वार्ताहर )
दहावी व बाराविच्या विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजीची भीती दूर व्हावी व त्यांना परीक्षेत उज्वल यश मिळावे या उद्देशाने हिवरखेड येथे इंग्रजी विषयाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रमेश दुतोंडे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेत डॉ. प्रा. संतोष गायकवाड व महेंद्र कराळे यांनी बाराविच्या व दहाविच्या विध्यार्थ्यांना पेपर कसा सोडवावा, वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, पत्रलेखन, सारांश लेखन इत्यादी लेखन कसे करावे, ग्रामर मध्ये कोणत्या चुका टाळव्यात याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी इंग्रजी विषयाची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली व विजेत्या विद्यार्थ्यांना रमेश दुतोंडे यांच्याकडून बक्षीसे देण्यात आली. हिवरखेडमध्ये शैक्षणिक वातावरण तयार करणारे शिक्षक विलास घुंगड, प्रा. अमोल येऊल, प्रा. श्रीकांत परनाटे, माधव गावंडे यांचा त्यांच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संदिप इंगळे,महेंद्र भोपळे, प्रविण येऊल, सुनिल इंगळे,किरण सेदानी,गणेश वानखडे,अन्सार भाई,बाबुराव वाकोडे, पंकज देशमुख, दानिश खान, विनोद ढबाले, रविंद्र वाकोडे, पत्रकार केशव कोरडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जवळपास चारशे विध्यार्थी या कार्यशाळेला उपस्थित होते. या सर्व विध्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास घुंगड, सूत्रसंचालन माधव गावंडे तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीकांत परनाटे यांनी केले.