अपघात

हिट अँड रन ; पल्सर ला धडक , तिघांचा मृत्यू 

Spread the love

चित्रपट पाहण्यासाठी गेले होते

प्रतिनिधी / बुलढाणा 

             रात्री चित्रपट पाहून पल्सर बाईक ला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पल्सर वर सवार तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. घटना अमडापुर येथील टिपू सुल्तान चौकात घडली आहे. यातील दोन तरुण एकाच कुटुंबातील तर एक त्यांचा मित्र आहे. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्यातील अमडापूरच्या टिपू सुलतान चौकात हा अपघात घडला आहे. या या अपघातात दोन जण एकाच घरातील असून तिसरा मित्र आहे. तिनही मृतक युवक उदयनगरचे रहिवासी आहेत.

उदयनगर निवासी प्रतिक संजय भुजे, भाऊ प्रथमेश राजु भुजे आणि सौरभ विजय शर्मा हे तिघे उदयनगरला एकाच पल्सर गाडीवरून येत होते. हे तिघे चिखलीला चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. परत येत असतांना अमडापूरच्या टिपू सुलतान चौकात यांच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की, अपघातात पल्सर गाडी चकाच्चूर झाली. अपघातानंतर अज्ञात वाहनाने धडक देऊन घटनास्थळावरून पोबारा केला. मात्र या अपघातात 3 जण ठार झाले आहेत. अपघातात धडक दिलेले वाहन फरार झाले आहे. अज्ञात वाहनाचा पोलीस शोध घेत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close