सामाजिक

संपूर्ण बौद्ध सण या शोध ग्रंथाचे हिंगणघाट शहर व तालुक्यातील बुद्ध विहारांकरीता भेट.

Spread the love

हिंगणघाट  / प्रतिनिधी
तथागत बहुद्देशीय विकास संस्था, हिंगणघाट, अंतर्गत *प्रा.डॉ.रविंद्र कांबळे,चंद्रपुर लिखीत संपूर्ण बौद्ध सण* हा शोध ग्रंथ हिंगणघाट शहर व तालुक्यातील बुद्ध विहार संबंधित कमीटी,संस्था चे पदाधिकारी तथा बौद्ध उपासक/उपासीका , कार्यकर्ते यांना हा शोध ग्रंथ या ग्रंथाचे लेखक प्रा.डॉ.रविंद्र कांबळे यांच्या हस्ते भेट स्वरूपात दान करूण दान पारमीता पुर्ण करण्याचा अती मोलाचा प्रयत्न *प्रबुद्ध नगर हिंगणघाट* येथील *सम्यक बुद्ध विहार* मध्ये करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.दुधे साहेब हिंगणघाट, मुख्य मार्गदर्शक प्रा.डॉ.रविंद्र कांबळे साहेब प्रमुख उपस्थिती आदरणीया प्रा.डॉ.विजयाताई र.कांबळे, चंद्रपुर, आदरणीया प्राचार्या अस्मिताताई भगत(दारुंडे),मा.ऍड.ऋषी सुटे साहेब , हिंगणघाट प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.या कार्यक्रमाला हिंगणघाट शहर व तालुक्यातील १५ च्यावर बुद्ध विहार संबंधित कमीटी,संस्था चे पदाधिकारी, बौद्ध उपासक/ उपासीका ,धम्म प्रचारक तथा धम्म बाल मित्र मैत्रिणी आवर्जून उपस्थित होत्या.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महाकारूणीक सिध्दार्थ गौतम बुद्ध, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांना पुष्प अर्पण करून मेनबत्ति प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.नंतर मान्यवरांचे उपस्थित जेष्ठ सामाजीक व धार्मिक कार्यकर्ते यांच्या तर्फे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. *विशेष सत्कार* म्हणून तथागत बहुद्देशीय विकास संस्था हिंगणघाट च्या वतीने वेणुताई सांगोडे,मंगलाताई खराटे यांच्या हस्ते सत्कारमूर्ती प्रा.डॉ.रविंद्र कांबळे साहेब यांना शॉल व पुष्प प्रदान करून सत्कार करण्यात आला.सोबतच *द सिम्बॉल आॉफ नोलेज डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय सिध्दार्थ नगर हिंगणघाट* व बौद्ध पंच कमेटी महिला व पुरुष संयुक्त मंडळ सिध्दार्थ नगर हिंगणघाट च्या तर्फे भारतीय संविधानाची उध्देशीका प्रत व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावीका व आभार व्यक्त संस्थेचे चे फाउंडर आयु.लताताई थुल यांनी केली तर सुत्र संचालन विजय झाडे यांनी केले.
कार्यक्रमाचा उद्देश व विषय यावर मान्यवरांनी विचार मंचावरुन आप -आपले विचार व मत व्यक्त केले .प्रा.कांबळे साहेबांनी *संपूर्ण बौद्ध सण* या ग्रंथा वीषयी विशेष व अल्पवेळेत सखोल विवेचन व मार्गदर्शन केले.
या प्रसंगी प्रामुख्याने सुधीर रिंगणे,टिकारामजी जवादे, प्रमोद पोथारे,दिलीप झाडे,वनिता कांबळे,ज्योती मेंढे,विनोद दारूंडे, राधाबाई काळे, सुधाताई रामटेके,ज्योती मानकर तसेच प्रबुद्ध नगर चे रहिवासी बौद्ध उपासक/ उपासीका उपस्थित होते. कार्यक्रमा चे आयोजक तथागत बहुद्देशीय विकास संस्था चे फाऊंडर आदरणीया लताताई थुल यांनी उपस्थित मान्यवरांचे व ज्यांच्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाले ते उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासीका तथा धम्म बाल मित्र मैत्रिणी यांचे व कार्यक्रमाला करीता विहार उपलब्ध करून दिला त्या सम्यक बुद्ध विहार बौद्ध पंच कमेटी चे तसेच भारतीय बौद्ध महासभा,हिं चे मनःपुर्वक आभार व्यक्त करीत कार्यक्रमाचे समारोप करण्यात आले.
जे बुध्द विहार सुटले असतील त्यांनी डॉ.दुधे यांच्या कडुन हा ग्रंथ घेऊन जाण्याकरीता सुचना करण्यात आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close