सामाजिक

हिंगणगाव – परसोडी ग्रा. प. कडून १० रू त एक्वा कॅन उपलब्ध 

Spread the love
शुद्ध पाणी प्या आणि निरोगी राहा चां नारा
 
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी 
                              स्वच्छ भारत सुंदर भारत ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवत हिंगणगाव ग्राम पंचायत ने ग्राम पंचायत हद्दीत साफसफाई कडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. यात जनतेच्या आरोग्याची विशेष काळजी घेत ग्राम पंचायत  आता १० रू त एक्वा कॅन चे पाणी उपलब्ध करुन देणार आहे.
                  गावात साफ सफाई असली की जनतेचे आरोग्य सुदृढ राहण्यात मदत होते. या गोष्टीकडे विशेष लक्ष देत हिंगणगाव ग्राम  पंचायत ने ग्राम पंचायत हद्दीत सफाई अभियान राबवून परिसर स्वच्छ आणि साफ ठेवला. त्यामुळे ते ग्राम स्वच्छता अभियानात प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. आता आणखी पलीकडे जात त्यांनी ग्राम पंचायत हद्दीतील लोकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करून दिली आहे.
             ग्राम पंचायत १० रू. त. कॅन उपलब्ध करून देणार आहे. या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन हिंगणगाव परसोडी ग्राम पंचायत चे सरपंच दुर्गाबक्षसिंग उर्फ बच्चु भाऊ ठाकूर यांनी केली आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close