हटके

हिंदू मौत्रिणीवर अत्याचार करून तिला विहिरीत ढकलले

Spread the love

वर्धा / विशेष प्रतिनिधी

              वर्धा शहरातील स्टेशनफैल परिसरातून एका धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. येथील एका मुस्लिम तरुणाने सालोड येथील तरुणीला जबरदस्तीने स्वतःच्या दुचाकीवर बसवून वर्धा येथे घेऊन आला. आणि शहरातील स्टेशन फैल येथील विहिरीजवळ तिच्या सोबत बोलत असताना तिला विहिरीत ढकलून दिले.

 वर्धा शहरातील स्टेशन फैल परिसरातील रहिवासी जुबेर पठाण याचे सालोड येथील एका हिंदू मुलीसोबत प्रेम होते. त्याने आपल्या प्रेयसीला दुचाकीवर बसवून सालोड येथून वर्धेत आणले.

स्टेशनफैल येथे एका विहिरीजवळ गोष्टी करीत उभे असताना तिला विहिरीत ढकलून दिले. सोबत तिची मैत्रीण असल्याने जीव वाचला. या घटनेची वर्धा पोलिसांनी नोंद घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेशन फैल परिसरातील जुबेर पठाण याचे सालोड हिरापूर येथील हिंदू मुलीवर प्रेम होते. काल जुबेर सकाळी तिला गावात भेटायला गेला. गोष्टी करीत असताना त्याने तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. यावेळी त्या ठिकाणी नागपूर येथून वर्धेत नर्सिंग शिकायला आलेली मैत्रीण उभी होती. जबरस्तीने मैत्रीणीला जुबेर नेत असल्याने नागपूर येथील मैत्रीणही त्याच दुचाकीवर बसली. त्याने आपली दुचाकी स्टेशन फैल भागात आणली.  एका विहिरीजवळ ते दोघेही बोलत उभे असल्याने नर्सिंगची मैत्रीण दूर उभी होती. दोघात गोष्टी सुरू असताना जुबेरने आपल्या प्रियसीचे केस ओढत शेजारी असलेल्या विहिरीवर नेऊन तिला ढकलून दिले. सोबत असलेल्या मैत्रिणीने आरडा ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी तिला बाहेर काढले. तिला सावंगी येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या घटनेपूर्वी तिच्यावर त्याने जबरदस्तीने अत्याचार केल्याचेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी जुबेर वर गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close