Uncategorized

माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार जाहीर!

Spread the love

मुंबई

विशेष प्रतिनिधी 

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याबाबतची घोषणा केली. लालकृष्ण अडवाणी यांच्या भारतीय राजकारणातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्ष म्हणून लालकृष्ण अडवाणी यांनी काम केल आहे. भाजपच्या स्थापनेत देखील त्याचं मोठं योगदान होतं. भाजपच्या स्थापनेनंतर ते १९८६ मध्ये पहिल्यांदा पक्षाचे अध्यक्ष बनले. १९८६ ते १९९० पर्यंत ते अध्यक्ष होते. १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या कालावधीत देखील लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केलं. खासदार म्हणून ते जवळपास तीन दशकं ससंदीय राजकारणात सक्रीय होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सराकरमध्ये अडवाणी यांनी १९९९ ते २००४ मध्ये देशाचं उपपंतप्रधानपद भूषवलं होतं.
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ मध्ये स्वातंत्र्यपूर्व भारतातील सिंध प्रांतात झाला होता. त्यांनी कराचीतील सेंट पॅट्रिक्स स्कूल मध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचं काम सुरु केलं. राजस्थानमध्ये आरएसएसचे प्रचारक म्हणून काम केलं. १९५७ मध्ये अडवाणी राजस्थान सोडून दिल्लीत आले. दिल्लीत तीन वर्ष काम केल्यानंतर अडवाणी पत्रकार म्हणून काम करु लागले. त्यांनी संघाच्या ऑर्गनायझरमध्ये सहायक संपादक म्हणून काम केलं.
ते सुरुवातीच्या काळात भारतीय जनसंघाचे नेते होते आणि इ.स. १९७४ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले.त्यांना आणीबाणीच्या दरम्यान कारावास घडला. इ.स. १९७७ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close