क्राइम

उच्चभ्रू वस्तीत चालणाऱ्या कुंटन खाण्यावर धाड ; दोन अल्पवयीन मुलं आढळली 

Spread the love

उदगीर, (जि. लातुर) / नवप्रहार डेस्क 

              हल्ली अल्प काळात जास्त पैसा कमावण्याची भूक मनुष्याला वाम।मार्गाकडे नेत आहे.  पुरुष नव्हे तर महिलां देखील महिला देखील पैशे कमावण्याच्या नादात वाम।मार्गाला लागल्या आहेत. शरीरविक्री करून पैसा कमावणे कमाईचा  सोपा मार्ग असल्याने अनेक महिला मुख्यतः शहरी आणि तालुका स्तरावरील महिला या मार्गाकडे वळल्या आहेत.  ग्रामीण पोलीस ठाण्याजवळील सोमनाथपूर हद्दीतील एका उच्चभ्रु वस्तीतील कुंटनखान्यावर सायंकाळी ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना पकडले आहे. यातील दोन पिडीतेची लातूरच्या महिला सुधारगृहात रवांनगी केली असून सहा जणांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या वेळेस दोन अल्पवयीन मुले या ठिकाणी आढळून आली आहेत.

याबाबत ग्रामीण पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी सोमनाथपुर हद्दीतील मारवाड काँलनी येथील उच्चभ्रू वस्तीमध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षकांना मिळाली.त्यांनी सापळा रचून सदर वस्तीतील एका घरात सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर धाड टाकली. त्यावेळेस त्यांना चार महिला, चार ग्राहक पुरुष कुंटणखाना चालवत असल्याचे दिसून आल्याने रंगेहात पकडले.

याची सखोल चौकशी केली असता या चार महिलांपैकी दोन महिलांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत देह विक्रीसाठी प्रवृत करण्यात आल्याचे समोर आले. या पिढीत महिलांचा जवाब घेतल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी मुंढे यांच्या फिर्यादीवरुन कुंठणखाना चालवणाऱ्या कल्लुबाई नरसींह माने, मुलगी बालिका नरसींह माने, विठ्ठल मारोती केंद्रे (वय-३०) रा.तळ्याची वाडी ता. कंधार, विठ्ठल भगवान नरसींगे (वय-३५) रा. निळकंठ, ता. औसा. व दोन अल्पवयीन बालक अशा आठ जणांवर शनिवारी रात्री अकराच्या सुमारास देह व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील दोन पिढीत महिलांना रात्री बारा वाजता येथील प्रथम वर्ग न्यायदिंडाधिकार्‍यांसमोर हजर केले असता त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना लातूरच्या महिला सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले. बाकी सहा आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

इतिहासातील दुसरा गुन्हा….

शहर व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी असे कुंटण खाणे चालू असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. उदगीर शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या इतिहासात दुसऱ्यांदा कुंटणखाना चालविणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून अशा पिढीत महिलांच्या शोषणाविरुद्ध मोहिम उघडून छापे मारून सदर आरोपीं विरोधात गुन्हे दाखल करण्याचा धडाका लावला आहे. पोलिसांच्या या कामगीरीमुळे कुंटणखाना चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close