Uncategorized

अनिल परब यांच्या मालकीचे साई रिसॉर्ट पाडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश 

Spread the love

रत्नागिरी /नवप्रहार मिडिया

 दापोलीमधील साई रिसॉर्ट पडणार हे आता निश्चित झालं आहे. साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं हायकोर्टामधील सुनावणीदरम्यान स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडावा लागणार आहे. मुंबई हायकोर्टाने तसे आदेश दिले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये या रिसॉर्टप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सोमय्या आणि अनिल परब यांचा या मुद्द्यावरुन कलगीतुरा रंगला होता. त्यानंतर आज मुंबई हायकोर्टाने रिसॉर्ट चार आठवड्यात पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा उबाठा नेते अनिल परब यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

मागे खेड जिल्हा कोर्टाने दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. हे रिसॉर्ट आधी अनिल परब यांच्या मालकीचे होते. त्यानंतर हे रिसॉर्ट त्यांचे मित्र आणि राजकीय नेते सदानंद कदम यांना विकण्यात आले होते. बांधकाम करताना अनेक नियमितता आढळल्या होत्या. त्यानंतर मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी रिसॉर्ड पाडण्याचे आदेश दिले होते.

राष्ट्रीय हरित लवादाने एक तज्त्र समिती स्थापन केली होती. समितीने रिसॉर्टची पाहणी केली होती. यामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत जागा पूर्वीप्रमाणे करण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली होती. याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी कोर्टात धाव घेतली होती.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close