हाय कोर्टाच्या वकीलाचे लाजिरवाणे कृत्य सोशल मीडियावर व्हायरल

वकील म्हटलं की कोर्टाच्या टायमिंग मध्ये त्यांना शिस्तीत राहण आवश्यक. पण ऑनलाइन कोर्टात काम करणाऱ्या एका वकिलाचे लाजिरवाणे कृत्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ऑनलाईन सुनावणीपूर्वीचा वकिलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे.
या व्हिडिओमध्ये कोर्टाच्या गणवेशातील एक वकील, सुनावणी सुरू होण्यापूर्वी एका महिलेसोबत गैर-व्यावसायिक आणि वैयक्तिक कृत्य करताना दिसत आहेत, जे कॅमेरात कैद झालं आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (Tuesday) घडली. व्हर्च्युअल कोर्टाची कार्यवाही सुरू होण्यापूर्वी न्यायाधीश उपलब्ध नव्हते आणि इतर लोक त्यांच्या प्रतीक्षेत होते. याच वेळी, न्यायालयात हजर राहण्यासाठी वकिलांनी आपला कॅमेरा ऑन ठेवला होता.
व्हिडिओमध्ये, कोर्टाचा गणवेश परिधान केलेले संबंधित वकील त्यांच्या खोलीत बसलेले दिसतात. त्यांचा चेहरा कॅमेऱ्यापासून थोडासा बाजूला आहे. त्यांच्यासमोर साडी परिधान केलेली एक महिला उभी आहे. अचानक, वकील त्या महिलेचा हात पकडून तिला आपल्याकडे खेचतात. महिला थोडीशी असहमत किंवा अस्वस्थ दिसत असून ती थोडा विरोध करते. मात्र, वकील तिला ‘पॅक’ करतात आणि त्यानंतर ती महिला मागे सरकते.
हा सर्व प्रकार व्हर्च्युअल कोर्टाच्या लाईव्ह कॅमेरात रेकॉर्ड झाला आहे, आणि त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं पसरत आहे.
हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हायरल व्हिडिओमधील वकील आणि महिलेची ओळख अद्याप निश्चित झालेली नाही. या व्हिडिओच्या सत्यतेबद्दल NDTV नेटवर्क पृष्टी करत नाही.
यापूर्वीही झाला होता प्रकार
व्हर्च्युअल कोर्टाच्या ‘मर्यादा’ आणि ‘शिस्त’ मोडण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी, जूनमध्ये गुजरात हायकोर्टाच्या व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान एक व्यक्ती चक्क टॉयलेटवर बसून आणि स्वतःला मोकळं करत सुनावणीमध्ये सहभागी झाला होता. त्या घटनेनंतर गुजरात हायकोर्टाने त्या व्यक्तीला 1 लाख रुपये दंड आणि 15 दिवसांची सामुदायिक सेवा करण्याची शिक्षा ठोठावली
वकिलाने केलेले हे कृत्य आणि ते कोर्टाच्या कामकाजापूर्वी कॅमेरात कैद होणे, यातून व्हर्च्युअल कोर्टाच्या शिस्तीवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आह