ए क्या हो रहा है बाबा … ए क्या हो रहा है !
वर्धा / नवप्रहार मीडिया
काल दि.१९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्धा आणि अमरावती भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ जिल्ह्यातील तळेगाव शामजी पंत येथे सभा झाली. मोदींची सभा आणि विरोधकांवर टीकास्त्र हे समीकरण आहे. पण येथील सभेत मोदींनी शरद पवार यांच्या बद्दल साधा ‘ब्र’ देखील उच्चारला नसल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आणि राजकीय वर्तुळात ‘ ए क्या हो रहा है बाबा , ए क्या हो रहा है ‘ अशी चर्चा आहे.
काल झालेल्या सभेत मोदींचे रौद्र यूप पाहायला मिळेल असा कयास होता.कारण वर्धा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीचा उमेदवार उभा आहे. उपस्थित प्रत्येकास वाटत होते की पंतप्रधान मोदी हे पवार व त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर टिकास्त्र सोडल्या खेरीज राहणार नाही. मात्र, मोदींचे भाषणातील शेवटचे वाक्य आटोपले तरी पवार यांच्या विरोधात चकार शब्द निघाला नाही. सभा आटोपल्यावर त्याच मुद्द्याची चर्चा रंगली आहे.
मोदींनी पवारांना का सोडले, यावर चर्वीतचर्वण सूरू आहे. मात्र हे असे का यावर बोलतांना एक काँग्रेस नेता म्हणाला की ज्यांच्यावर भ्रष्टाचारचे आरोप केले त्या अजित पवार यांना सोबत घेतले तर मग शरद पवार यांच्या विरोधात कसे व काय बोलणार असा प्रश्न त्यांना कदाचित पडला असेल. एक तेवढेच खरे की ही सभा या ठिकाणी पवारांचा उमेदवार असूनही त्यांच्यावर टीका न करता पार पडली याची नोंद कायम राहील, असे पवार समर्थक एक ज्येष्ठ नेता म्हणाला.
.