धामणगाव रेल्वे येथे आयुष्मान भव हायड्रोसील शस्त्रक्रिया शिबिर
हत्तीरोग नियंत्रण पथक अमरावतीचा उपक्रम 5 रुग्णांवर शस्त्रक्रिया*
धामणगाव रेल्वे /प्रतिनिधी
राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण पथक अमरावती आयोजित हायड्रोसील शस्त्रक्रिया शिबिर ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे दि.20/10/2023 रोजी आयोजित करण्यात आले. या शिबिरात उपपथक धामणगाव रेल्वे, तळेगाव दशासर, नांदगाव खांडेश्वर, कुऱ्हा येथील 5 हायड्रोसील रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया सर्जन डॉ.संतोष राऊत सर तसेच डॉ.भोगे सर, डॉ.शुभम पवार सर यांनी केली.
हे शिबिर मा.सहायक संचालक डॉ.भंडारी सर, मा.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी सर, मा.हत्तीरोग अधिकारी श्री.दिनेश भगत सर, मा.वैद्यकीय अधिक्षक डॉ.साबळे सर, मा.प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी डॉ.जुनेद सर, श्री.प्रकाश कनेरे, श्री.विजय तोंडरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले.
सदर हायड्रोसील शिबिर यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम आरोग्य निरीक्षक सुधाकर चोपकर, श्री.मोहन तायडे, श्री.आर.टी.दुधकवरे, श्री.प्रमोद भावेकर, श्री.सोनोने व आरोग्य कर्मचारी श्री.घनश्याम भोयर, श्री.पंकज खांडरे, श्री.गजानन इंगळे, श्री.किशोर बकाले, मोहम्मद मुशफिक, श्री.राहुल भोसले आणि नियमित क्षेत्र कर्मचारी श्री.गावंडे, श्री.हरिदास इंगळे यांनी घेतले.
सर्व रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांची देखभाल व काळजी ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथील सर्व आरोग्य कर्मचारी घेत आहेत.