शाशकीय

अरे बाबो ….चक्क रुग्णांऐवजी दुचाकी वाहने पोहचली ओपीडी कक्षामध्ये

Spread the love
भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रात्री नऊ वाजता च्या दरम्यान, शहापूर गावातीलच एक वृद्ध महिला उपचाराकरता दवाखाना येथे आले असता त्यांना उपचार न करता डॉक्टरांनी, हेकेकोरपणाने पालथून लावले.
या सर्व प्रकरणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे,
त्या व्हिडिओ नुसार एक वृद्ध महिला आजाराने दवाखान्यात आली असता, महीला डॉक्टर व गावकऱ्यांसोबत शाब्दिक बाचाबाची झाल्याने रुग्णाची तपासणी न करता त्या रुग्णाला भंडारा येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
परंतु दवाखान्याच्या बाह्य रुग्ण विभागात दोन दुचाकी गाड्या, उभ्या असल्याचे दिसून आले.
बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांच्या सोयी करता असलेल्या पलांगजवळ  या दुचाकी वाहने ठेवल्या होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्रात शेडची उभारणी करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहने ठेवण्याची व्यवस्था आहे, त्यावरच उपस्थित शहापूर ग्रामपंचायत सदस्य सचिन गाडेकर यांनी प्रश्न उपस्थित करताच महिला डॉक्टराला संतापल्या, व त्यां हेकेखोरपणे, रुग्णाची तपासणी न करता सरळ आपल्या डॉक्टरांच्या कक्षात गेल्या.
असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, काही माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या महिला डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता पुन्हा हेकेखोरपने, आपला संताप व्यक्त केला. आता या महिला डॉक्टरांवर जिल्हा वैद्यकीय अधिकारी काय कार्यवाही करणार, की डॉक्टरांना उभे दिले जाणार.
परंतु सदर प्रकरनात जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे डॉक्टरांच्या वतीने तक्रार देण्यात आली असून, त्यावर रुग्णांच्या नातेवाईकांवर आता काय कारवाई केली जाते याकडे सर्व ग्रामवासियांचे लक्ष लागले आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close