क्राइम

अरे बाबो.…..थायलँड येथून मुली आणून केला जात होता वेश्याव्यवसाय

Spread the love

मसाज पार्लर च्या नावाखाली सुरू होता हा अवैध प्रकार 

१५ मुलींची केली सुटका 

पुणे / नवप्रहार डेस्क

                मसाज पार्लर च्या नावाखाली थायलँड येथून मुली बोलबुन त्यांच्या कडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या हॉटेल  मॅनेजर आणि त्याच्यासह चार लोकांना ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. थायलँड आणि इतर अश्या १५ मुलींची सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी उल्हासनगरच्या हॉटेलचा मॅनेजर कुलदिप उर्फ पंकज सिंग (३७, रा. उल्हासनगर) याच्यासह चौघांना ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांनी बुधवारी दिली. त्यांच्या ताब्यातून १५ मुलींची सुटका करण्यात आली आहे.

तरुणींकडून देहविक्री

ठाणे शहर परिसरात थायलंड देशातील महिला तसेच काही तरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, सहायक पोलिस आयुक्त बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नरेश पवार, सहायक पोलिस निरीक्षक सुनिल तारमळे, उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सुभाष तावडे आणि हवालदार संजय राठोड आदींच्या पथकाने २ ऑक्टोबर राजी पहाटे १.१० वाजण्याच्या सुमारास उल्हासनगर तीन, सेक्शन १७ मधील सितारा लॉजिंग अँड बोर्डींगमध्ये एका बनावट ग्राहकाच्या मदतीने धाड टाकली.

५ हजारांचा सौदा

एका महिलेसाठी पाच हजारांचा सौदा झाला होता. यातील काही रक्कम हॉटेलच्या मॅनेजरकडे तर काही रक्कम या महिलांना दिली जात होती. गेल्या महिनाभरापासून हा प्रकार याठिकाणी सुरु होता. त्यांच्याकडील पासपोर्ट आणि व्हिजाची तपासणी केली जात असून त्यांनी या कागदपत्रांसाठी कोणाची मदत घेतली याचीही चौकशी केली जात आहे.

मॅनेजरसह चौघांना ताब्यात

मॅनेजर कुलदीप याने तब्बल १५ थायी मुली तसेच महिलांना या बनावट गिऱ्हाईकांकडे आणल्या. पोलिसांच्या पथकाने लॉजच्या मॅनेजरसह चौघांना ताब्यात घेतले. त्यानंतर १५ पिडित महिलांची सुटका केली. या लॉजमधून पाच लाख २७ हजारांची रोकड आणि सामुग्री जप्त केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४३ सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close