हटके

अरे बाबो ! आता पर्यंत डबल डेकर बस पहिली असेल आता पाहा डबल डेकर सायकल

Spread the love

                       तशी उंच आणि सिंगल चाकाची सायकल सर्कस मध्ये पाहायला मिळते. आपण डबल डेकर बस पाहिली असेल नाही निदान तर तिचा फोटो तरी पहिला असेल.पण आपण कधी डबल डेकर सायकल बद्दल ऐकले आहेत काय ? नाही ना ! तर चला आम्ही आपणाला त्याबद्दल सांगतो.

                भारतात टाकाऊ वस्तू पासून विकाऊ वस्तू बनविण्याची कला काही लोकांकडे आहे. त्याला भारतीय भाषेत ‘ जुगाड ‘ असे नाव दिल्या गेले आहे.आपल्या देशातील लोक ही ‘  जूगाड ‘  टेक्नॉलॉजी वापरून अश्या काही वस्तूंची निर्मिती करतात की बडे बडे उद्योगपती देखील त्यांच्या कामाची आणि कलेची दखल घेतात.

 यात कधी कोण कारपासून हेलिकॉप्टर बनवतो, तर कोणी विटांपासून कूलर… सध्या अशाच एका जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात एका काकांनी जुगाडपासून अशी एक भन्नाट सायकल तयार केली आहे, जी पाहून सगळेच हैराण झाले आहेत. तुम्ही आत्तापर्यंत डबल डेकर बस पाहिली असेल, पण यात चक्क एक डबल डेकर सायकल पाहायला मिळत आहे.

व्हिडीओमध्ये एक काका रस्त्यावर सायकल चालवताना दिसत आहेत, पण ही सायकल साधारण नसून जुगाडपासून बनवली आहे. व्हिडीओ पाहून लोकांना प्रश्न पडला की, ही सायकल नेमकी बनवली कशी? तसेच ते काका या सायकलवर चढले कसे?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक काका एकावर एक जोडलेली सायकल चालवताना दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी या सायकलला डबलडेकर सायकल असे म्हटले आहे. ही डबल डेकर सायकल काका अगदी आरामात चालवताना दिसत आहेत. सामान्य सायकलपेक्षा उंच असूनही काका ती सहजतेने चालवताना दिसत आहेत. पण, व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की, काका आता या सायकलवरून खाली उतरणार कसे?

 

 

भन्नाट सायकलचा हा व्हिडीओ @dc_sanjay_jas या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे, ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही सायकल नेमकी कशी बनवली असा प्रश्न लोकं विचारत आहेत. या सायकलमध्ये अॅटलसची फ्रेम कापून ती नॉर्मल सायकलला जोडण्यात आली आहे. या व्हिडीओवर एका युजरने लिहिले की, ‘सर, हे महान काका सायकलवर कसे चढले… हे घरी शक्य आहे… पण, रस्त्यावर असताना अशाप्रकारच्या सायकलवर आधाराशिवाय चढू शकत नाहीत…’, दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘सर, बाकी सर्व ठीक आहे, पण आता ते खाली कसे उतरतील? ‘

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close