सामाजिक

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी व AR न्यूज – स्पेशल लेडीज न्यूज चॅनलच्या संयुक्त विद्यमाने “श्रावण शॉपिंग महोत्सव २०२४”

Spread the love

 

अहमदनगर : रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी आणि AR न्यूज – स्पेशल लेडीज न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण शॉपिंग महोत्सव २०२४ आयोजित करण्यात आला आहे. हा खरेदी महोत्सव शनिवार, ३ ऑगस्ट ते रविवार, ४ ऑगस्ट २०२४ रोजी कोहिनूर मंगल कार्यालय, गुलमोहर रोड, अहमदनगर येथे संपन्न होणार आहे.

या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या व्यवसायाला नवीन उंची द्या! असे ब्रीध देऊन येथे तुम्हाला विविध प्रकारच्या राख्या, महालक्ष्मी सजावटीचे साहित्य, कुर्ती, ज्वेलरी, गिफ्ट आर्टिकल्स, मसाले इत्यादी सर्व प्रकारच्या खरेदीसाठी एकाच ठिकाणी सुविधा मिळेल. त्याचबरोबर, स्वादिष्ट फूड स्टॉल्सचाही आनंद घेता येईल.

त्याचप्रमाणे या महोत्सवात सर्वांसाठी विशेष आकर्षण ही ठेवण्यात आले आहे. शनिवारी, ३ ऑगस्ट २०२४ रोजी डिजिटल भगवद्गीता शो तसेच रविवारी, ४ ऑगस्ट २०२४ रोजी सिमरतमल कुंदनमल ज्वेलर्स प्रस्तुत “चालता बोलता होम मिनिस्टर” (अँकर: चेतन गायकवाड) हा महिलांसाठीचा अतिप्रिय खेळ देखील आयोजित करण्यात आला आहे. विजेत्यांना पैठणी, सोन्याची नथ, चांदीची नाणी तसेच अनेक बक्षिसे मिळणार आहेत.

महिलांसाठी सुवर्णसंधी, रोटरीच्या महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांतर्गत महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोटरी प्रियदर्शिनी क्लबने पूर्णतः महिलांसाठी हक्काची ओळख आणि ग्राहक मिळवून देण्याची ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. या खरेदी महोत्सवात १०० हून अधिक महिलांनी व इतर काही व्यवसायिकांनी भाग घेतला असून, ग्राहकांना विविध गृह उपयोगी व गृह निर्मित तसेच विविध ब्रँड्सचे नाना प्रकारचे माल खरेदी करण्याची संधी आहे.

सदर श्रावण शॉपिंग महोत्सवाचे उद्घाटन मा. राणी ताई लंके व मा. मिनल गंधे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. श्रुती बोज्जा व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या नूतन अध्यक्षा सौ. मीनल ईश्वर बोरा यांनी या सोहळ्याला पूर्ण जिल्ह्यातून महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

हे खरेदी उत्सव आपल्या व्यवसायाला आणि महिलांच्या सक्षमीकरणाला नवा आयाम देईल.

या खरेदी महोत्सवात भाग घेण्याकरिता व इतर माहिती करिता संपर्क रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी
अध्यक्ष: सौ. मीनल ईश्वर बोरा यांना ९३७०७७६०५८ वर करता येईल.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close