
लखनऊ / नवप्रहार डेस्क
जगात असे काही प्रकरण घडतात की त्यावर हसावे की रडावे हेच समजत नाही. ज्या सुनेवर सासऱ्याला वडील समजून आणि सासऱ्यावर सुनेला मुलगी समजून वागवण्याची जबाबदारी असते. त्याच सासरा आणि सुनेने असे कृत्य केले आहे की नवऱ्याला पोलिसात धाव घ्यावी लागली. सोबतच समाजात या दोघांच्या अश्या लज्जास्पद कृत्याची जबरदस्त चर्चा आहे.
एक विवाहित महिला आपल्या पतीला सोडून कुठेतरी गायब झाली होती. तेव्हापासून तिचे सासरेही बेपत्ता होते. नवरा दोघांचा शोध घेत राहिला. पण ते कुठेच सापडले नाही. सात वर्षांनंतर पतीला समजलं, की त्याच्या वडिलांनी आणि पत्नीने एकमेकांशी लग्न केलं आहे आणि दोघेही चंदौसी येथे राहत होते. पतीने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. ही अजब घटना उत्तर प्रदेशातील बदायू येथून समोर आली आहे.
पोलिसांनी दोघांनाही पकडून पोलीस ठाण्यात आणलं, त्यानंतर सून चार वर्षांपूर्वी सासऱ्यासोबत पळून गेल्याचं उघड झालं. दोघांचं लग्न झालं आणि आता त्यांना एक मुलगाही आहे. पतीवर नाराज असल्याचं विवाहितेने सांगितलं. तिने स्वतःच्या इच्छेने सासरच्यांसोबत पळून जाऊन त्यांच्याशी लग्नही केलं होतं. लग्नाच्या वेळी पती अल्पवयीन असल्याचंही तिने सांगितलं. त्यामुळे ती हे लग्न स्वीकारत नाही. ती आता स्वतःला सासऱ्याची पत्नी मानते आणि हेच लग्न स्वीकारते. महिलेने तिच्या सासरच्यांसोबतच्या लग्नाची कागदपत्रेही पोलिसांना दाखवली. या कारणामुळे पोलिसांना दोघांनाही सोडून द्यावं लागलं. मात्र, हे प्रकरण आता चर्चेचा विषय ठरलं आहे.
प्रकरण बदायूं जिल्ह्यातील दबतोरी चौकी भागातील आहे. येथे एका तरुणाने काही दिवसांपूर्वी बिसौली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याने आरोप केला की – 2016 मध्ये वजीरगंज भागातील तरुणीशी त्याचं लग्न झालं होतं. दोघेही वर्षभर एकत्र राहिले. पुढच्या वर्षी बायको आणि त्याचे वडील कुठेतरी गायब झाले. तेव्हापासून तो या दोघांचा शोध घेत होता. मात्र सात वर्षानंतर ते दोघेही चंदौसी येथे राहत असल्याचे त्याला समजले. दोघांचे लग्नही झाले आहे.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत महिलेला आणि तिच्या सासऱ्याला पकडून पोलीस ठाण्यात आणलं. चौकशीत महिला पतीवर नाराज असल्याचं समोर आलं. लग्नाच्या वेळी तिचा नवरा अल्पवयीन होता. त्याचं शिक्षणही झालं नव्हतं. तसंच तो काहीही कमवत नव्हता. त्यामुळे ती स्वत:च्या मर्जीने सासऱ्यासोबत गेली होती. त्यानंतर दोघांनी कोर्टात लग्न केलं. आता तिला सासऱ्याचा दोन वर्षांचा मुलगाही आहे. दोघेही त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. महिलेने सांगितलं की, गावात बदनामी होण्याच्या भीतीने ते चंदौसी येथे राहू लागले आहेत.