सामाजिक

हृदयद्रावक … एकाच कुटुंबातील तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू 

Spread the love

वाशिम ( प्रतिनिधी) 

              शेतात फवारणीसाठी गेलेले दोन चुलत भाऊ संध्याकाळ होऊन देखील घरी न परतल्याने त्यांना पाहण्यासाठी वडील गेले असता ते ही विजेच्या धक्क्याचा बळी पडले. सदर घटना मंगरुळपीर तालुक्यातील पांगरी महादेव शिवारातील किसन जिरे यांच्या शेतात घडली. वास्तविक या तिघांचा मृत्यू शेतात तुटून पडलेल्या विजेच्या जिवंत तारेचा स्पर्श लागून झाला असल्याचे समजते. या घटनेनंतर महावितरण कंपनी विरोधात जनतेचा रोष उफाळून आला आहे. मुख्य म्हणजे कोल्हापूर मध्यें देखील काही दिवसांपूर्वी विजेच्या जिवंत तारेमुळे दोन भावांचा मृत्यू झाला होता.

विजेचा धक्का लागून मृत झालेल्यांमध्ये वडील, मुलगा आणि त्याच्या चुलत भावाचा समावेश आहे. या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं पांगरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतात फवारणीसाठी गेलेला मुलगा आणि पुतण्या शेतामधून घरी आले नसल्यानं वडील त्यांना पाहण्यासाठी शेतामध्ये गेले असता शेतात जमिनीवर तुटून पडलेल्या जिवंत विजेच्या तारेचा स्पर्श होऊन मुलांसह वडिलांचाही मृत्यू झाला आहे.

घरातील 2 मुलांना शोधण्यासाठी वडील गेले असता बराच वेळ होऊन हे तिघे ही घरी न आल्यानं ग्रामस्थांनी शेत गाठत त्यांचा शोध घेतला असता त्यांना हे तिघे ही करंट लागून मृत झाल्याचं दिसलं. केवळ महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे तिघांचा नाहक बळी गेला असून ग्रामस्थांमध्ये महावितरण विरोधात मोठा रोष दिसत आहे. एकाच कुटुंबातील वडील, मुलगा आणि पुतण्याचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या घटनेचा तपास पिंजर पोलीस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close