शाशकीय

आरोग्य विभागाचा गलथानपणा उघड ; कोरोना काळातील मृतदेहांवर अंत्यसंस्कार झालेच नाही

Spread the love
मृतदेहाचा फक्त सांगाडाच उरला होता

रायपूर  / नवप्रहार मीडिया

 
                       एकीकडे सरकार जनतेच्या आरोग्यावर अमाप पैसा खर्च करते. जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शासन विविध योजना आणत असते. पण ज्या विभागावर जनतेचे स्वास्थ योग्य राहण्याची जबाबदारी आहे तो आरोग्य विभागच निद्रिस्त असल्याचे आणि कर्मचाऱ्यांचा गबाळपणा व कर्व्यशून्यपणा उघड झाला आहे. या ठिकाणी कोरोना काळात मृत्यू झालेल्या मृतदेहावर कर्मचारी अंत्यसंस्कारच करण्याचे विसरून गेले. शेवटी मीडियात बातम्या प्रसिद्ध झाल्यावर तीन मृतदेहावर  जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेसगानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. पण तो पर्यंत मृतदेहाचा सांगाडाच उरला होता.
                       अंदाजे 4 ते 5 वर्षांपूर्वी कोरोना ने जगात थैमान घातले होते. भारतात देखील ही महामारी पसरली होती. यात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी शासन मृतदेह कुटुंबाला न देता त्यावर शासकीय खर्चाने अंत्यसंकार करत होते.  मृतदेहाला पीपीई किट मध्ये गुंडाळून ठेवत होते. परंतु छत्तीसगढ च्या मेकहारा सारख्या मोठ्या शासकीय रुग्णालयात हा गैरप्रकार घडल्याचे उघड झाले आहे.
पहिल्या लाटेतच या तिघांचा मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून कोणीही मृतदेहांकडे लक्ष दिलं नाही. या प्रकरणाबाबत येथे राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की, मीडियामध्ये बातमी आल्यानंतर प्रशासन कारवाईत आलं आणि मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तोपर्यंत या लोकांचे फक्त सांगाडेच राहिले होते.
रायपूरच्या मेकहारा रुग्णालयात, कोरोनाचे हे मृतदेह गेल्या साडेतीन वर्षांपासून पीपीई बॅगमध्ये बंद ठेवण्यात आले होते. हे रुग्णालय राज्यातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयांपैकी एक आहे. येथे दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. अशा परिस्थितीत त्यांच्या प्रकृतीबाबतही निष्काळजीपणा होत होता. अंत्यसंस्काराच्या वेळी या मृतदेहांची अवस्था इतकी भयानक होती की हे मृतदेह स्त्रियांचे आहेत की पुरुषांचे हे कळणंही कठीण झालं होतं.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close