त्याला पत्नीवर होती शंका ; पाठलाग करत पोहोचला लॉजवर आणि ……
पुणे / नवप्रहार मीडिया
पत्नीचे अवैध संबंध असल्याचा संशय असल्याने पतीने तिला रंगेहाथ पकडण्याचा प्लान आखला होता. २८ डिसेंबर रोजी पत्नी घरातून बाहेर पडल्यावर पतीने तिचा पाठलाग केला. पत्नी वाकड येथील लॉजवर पोहोचल्यावर काही वेळाने प्रियकर देखील तेथे पोहोचला. त्यानंतर काही वेळाने महिलेचा पती आपल्या मित्रांसह लॉजवर पोहोचला. आणि त्याने पत्नी प्रियकरासह ज्या रुम मध्ये होती त्या रुम चे दार तोडले.
त्यावेळी पत्नी निर्वस्त्र नको त्या अवस्थेत प्रियकरासोबत बेडवर आढळली. पत्नीने विश्वासघात केल्या प्रकरणी पतीने वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पत्नीचे बाहेर दुसऱ्या कुणाशी संबंध असल्याचा पतीला संशय होता. यामुळे पती हा पत्नीवर लक्ष ठेऊन होता. पत्नीला रंगेहात त्याला पकडायचे होते. यामुळे तो तिच्यावर पाळत ठेऊन होता. दरम्यान, गेल्या महिन्यात २८ डिसेंबर रोजी पत्नी ही घरा बाहेर पडली. यावेळी पतीने तिचा पाठलाग केला.
पत्नी ही वाकड परिसरातील एका लॉजमध्ये गेली. दरम्यान, काही वेळाने तिचा प्रियकर लॉजमध्ये आला. यावेळी पती आणि त्याच्या काही सहकाऱ्याने थेट लॉजमध्ये जात पत्नी असलेल्या रूमचा दरवाजा तोडला. यावेळी पत्नी ही निर्वस्त्र, प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवत असतानाच पतीला दिसली. दरम्यान पत्नीला पतीने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली. यावेळी पतीने पत्नीच्या प्रियकराला चोप दिला. तसेच या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात दखल पात्र तक्रार दाखल केली आहे.
पुण्यात पती आणि पत्नीच्या नाते संबंधाला काळिमा फसणाऱ्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पतीने पैशांसाठी आपल्या पत्नीला त्याच्या मित्रांशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले होते. त्यानंतर आज ही घटना उघडकीस आल्याने पुण्यात नेमके चाललय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.